१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 530

४९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्त्री-पुरुषांनी भाग घ्यावा. वंदना सकाळी ९ ते ११ ह्या वेळात घेण्यात याव्यात, संध्याकाळी ४ वाजता सर्व केंद्राधिकाऱ्यांनी, शाखा प्रमुखांनी तसेच इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ कॉलेज, आनंदभवन येथे घेण्यात आलेल्या सभेस हजर

राहावे.

आपले नम्र,

का. वि. सवादकर, वा. कु. कबीर,

भ. स. गायकवाड. चिटणीस, भा. बौ. महासभा.

दिनांक १३-१०-५६ पर्यंत जमणारी सर्व वर्गणी दिनांक १५-१०-५६ रोजी संध्याकाळी ६ वाजता (बुद्ध भूषण छापखाना) भा. बौ. महासभेच्या कचेरीत भरणा करावी. इतर कार्यासाठी तिचा उपयोग करू नये.

निवेदनाप्रमाणे भारतांतील ठिकठिकाणच्या दलित बांधवांच्या शुभेच्छा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध दीक्षादिनी व्यक्‍त करण्यासाठी, सामुदायिक बुद्ध वंदना घ्याव्यात. या बुद्ध वंदनेत, सर्व आबाल वृद्धांना समाविष्ट करून घ्यावे, कोणीही गैरहजर राहू नये. सकाळी नऊ वाजण्याचे आत सर्वांनी स्नान करून व पांढरे कपडे परिधान करून ९ ते ११ अशी सामुदायिक बुद्ध वंदना करावी. संध्याकाळी आपल्या वस्तीत, सर्वांनी एकत्र जमून, सभा घेऊन, प्रसंगाचे महत्त्व व बौद्ध धर्माची आवश्यकता यावर विवेचन करावे. या सभा अत्यंत शांत, एकोप्याच्या व बंधुभावनेने पार पाडाव्यात. सदर सूचना, भारतीय बौद्ध ` महासभेच्या चिटणीसांच्या निवेदनाप्रमाणे, जिल्ह्या-जिल्ह्यातील दलित बांधवांकरिता प्रामुख्याने आहेत. त्या उत्कृष्टरित्या पार पाडल्या जातील अशी खात्री आहे.

नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध दीक्षेचा विधी झाल्यावर मुंबई, पुणे वगैरे अन्य ठिकाणी इतर दलित बांधवांच्या सामुदायिक धर्मांतराच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हजर राहू शकतील की काय याची माहिती पुढे प्रसिद्ध करण्यात येईल.

ज्या कोणा दलित बांधवांना नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध दीक्षेचा समारंभ पाहाण्याचे भाग्य लाभणार नाही, त्यांच्याकरिता ' प्रबुद्ध भारत ' मध्ये नागपूरची इत्थंभूत माहिती पुढील अंकी देण्यात येईल, छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात येतील. ' प्रबुद्ध भारत ' चा खास "बौद्ध धर्म दीक्षा-अंक "' . म्हणूनच प्रसिद्ध होईल. तरी वाचकांनी आपला पुढील अंक राखून ठेवावा.” १

) प्रबुद्ध भारत : १३ ऑक्टोबर १९५६.