बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४९१
' नवयुग ' मुंबईच्या वार्ताहराने या बौद्ध धम्मदीक्षेच्या सोहळ्याकरिता हजर राहणाऱ्यांचे मुंबई ते नागपूर पर्यंतचे प्रवास वर्णन आणि नागपूर येथील सोहळ्याचे वर्णन जे केले आहे ते येणेप्रमाणे-
“ ज्यांच्या आजोबा पणजोबांना रस्त्यावर थुंकण्याची मनाई असल्यामुळे गळ्यात मडकी बांधून हिंडावे लागत होते, ज्यांच्या वाडवडिलांना रस्त्यावर ब्राह्मण येताना दिसला की त्याच्यावर आपली सावली पडू नये, म्हणून काट्याकुट्यात उड्या माराव्या लागत होत्या आणि आजतागायत ज्यांना खेडोपाडी मृत ढोरांची व्यवस्था करावी लागते, आजतागायत ज्यांना बिगारीसाठी वेठीवर धरले जाते, त्या पाच लाख अस्पृश्य बांधवांनी जीर्णशीर्ण हिंदू धर्माचा त्याग करून ता.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे श्रद्धानंद पेठेत खास उभारलेल्या मंडपात बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या लक्षावधी अनुयायांसह ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी बुद्ध धर्माचा स्वीकार करणार ही वार्ता सर्व महाराष्ट्रात जाहीर झाल्याबरोबर सर्व अस्पृश्य समाजात एकच खळबळ उडाली' होती. वास्तविक पाहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणेत नवीन असे काहीच नव्हते. १९३५ साली सर्व अस्पृश्य बांधवांनी धर्मांतर करावे असा ठराव डॉक्टरसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघटनेने पास केला होता. तेव्हापासून ` हा विचार डॉक्टरसाहेब हे भारतातील केवळ एक विद्वान गृहस्थ नाहीत, तर अमानुषपणे हजारो वर्षे वर्णाश्रम धर्माने माणुसकी नष्ट करून टाकलेल्या कोट्यावधी दलित जनतेचे जबाबदार पुढारी आहेत. या दलित समाजाबद्दलची त्यांची आत्मीयता ही भाडोत्री नाही. या दलित समाजाबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि कळकळ ही “ अस्पृश्य समाजाचा उद्धार केला पाहिजे “ या रजोगुणी अहंकारातून निर्माण झालेली नाही. अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचे कार्य डॉक्टरसाहेबांनी उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे केलेले नाही. स्वतः त्या समाजातीलच असल्यामुळे त्यांना चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या हिंदू धर्मात “ अस्पृश्य " समाजातील मानवी प्राणी उत्क्रांतीचे सारे नियम गुंडाळून पशु कसा बनतो हे अगदी जवळून पाहावयास मिळाले होते. अस्पृश्य समजला गेलेला मानवी प्राणी पृथ्वीवर कोठल्याही देशात सापडणार नाही. दगडधोंड्यात सुद्धा “ ब्रह्माचा ” साक्षात्कार मिळणाऱ्या या भारतातच तो हजारो वर्षापासून आढळून येतो. हिंदू धर्माच्या *“ उच्च, उदात्त, विशाल" अशा तत्त्वज्ञानाचा अनुभव व्यक्तिशः डॉक्टरसाहेबांना अगर त्यांच्या हजारो अस्पृश्य बांधवांना क्वचितच मिळाला
असेल. वास्तव जीवनात अस्पृश्य बांधवांना न्याय, दया, करूणेचा अनुभव क्वचितच येतो, आणि “ समता "' अनुभवण्यासाठी, तर प्रत्यक्ष शारीरिक मृत्युलाच