१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 532

४९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कवटाळावे लागते. “ आत्मिक समता “ यामुळे साध्य होते असा सनातन्यांचा दावा आहे. बिचाऱ्या अस्पृश्य बांधवाच्या देहाला जिवंतपणी तर सामाजिक समतेचा अनुभव कधी येत नाहीच, पण मेल्यावरही त्याचे प्रेत स्पृश्य हिंदुंच्या स्मशानभूमीत परवा परवापर्यंत जाळले जाणेही अशक्य होते.

या हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय डॉ. आंबेडकरांनी १९३५ साली घेतला. यात अस्पृश्यांना आश्चर्य ते कसले वाटणार ? त्यांना आश्चर्य याचेच वाटते की, त्यापूर्वीच हा निर्णय का घेतला नाही ? आणि १९५६ पर्यंत निर्णय घेऊन सुद्धा डॉक्टर का थांबले ? स्वतःच्या कोट्यावधी अनुयायांची गंभीर जबाबदारी आणि या अनुयायांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्‍नांमधील गुंतागुंत न

यामुळेच डॉक्टरसाहेबांना हा विलंब लागला असावा असे वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्याबरोबर मतभेद असू शकेल, पण त्यांच्या विलंबाचा आधार घेऊन त्यांच्या हेतुचा विपर्यास करणे हा तर शुद्ध अधमपणा होता. डॉक्टरसाहेबांच्या या उपक्रमाला “ राजकीय स्टंट "' म्हणून संबोधण्यासही काही विद्वान लोकांनी कमी केले नाही, १४ ऑक्टोबरला नागपूर मुक्कामी या तथाकथित "' स्टंटचे " प्रात्यक्षिक ज्यांनी ज्यांनी पाहिले असेल त्यांना त्यांना या कुत्सित टीकेची चीड येणे स्वाभाविकच होते आणि तिचा फोलपणा तर मैदानावर जमलेल्या सुमारे पाच लाख लोकांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेऊनच सिद्ध केला. सनातन वर्णाश्रम धर्मावर इतका जबरदस्त प्रहार भगवान बुद्धानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच केला या विधानाला प्रत्यक्ष इतिहासाचीच ग्वाही मिळू शकते आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या लक्षावधी अनुयायांच्या तोंडून आज एकच घोषणा निघत आहे;

बाबासाहेब करे पुकार ।

बुद्धधर्मका करो स्वीकार ।

अस्पृश्य समाजाच्या आणि सवर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने सुद्धा ही युगप्रवर्तक सामाजिक घटना प्रत्यक्ष घडत असताना तिथे हजर राहाण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो.

नागपूरला एक दिवस अगोदर पोहोचणे बरे असा सूज्ञ विचार करून मी १२ तारखेला रात्रीच नागपूर एक्सप्रेसने निघालो. टिकिट काढले आणि बोरीबंदर स्टेशनवरच खडूने लिहिलेला एक मोठा बोर्ड मी पाहिला. * नागपूरला