१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 533

बुद्ध धर्मनेच जगाचा उद्धार होणार आहे ४९३

जाण्यासाठी स्पेशल. ट्रेन रात्री सव्वा नऊला सुटणार आहे “ असे या बोर्डावर

| लिहिले होते. स्टेशनवर

आकाश पाताळ एक करो |

बुद्ध धर्मका स्वीकार करो | ”

{ _ “परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, “

“ भगवान गौतम बुद्ध की जय. "

¦ या घोषणा हजारो मुखातून होत होत्या. स्त्रिया, मुले, म्हातारे, तरूण एकच ' धावपळ करताना दिसत होते. अस्पृश्य समाजातील सुशिक्षित मंडळी प्रोफेसर

' डॉक्टर, वकील हे आपापसात जोराजोराने " बौद्धिक पातळीवर '' चर्चा करीत होते. अस्पृश्य समाजातील शेकडो रेल्वे कामगार, गिरणी कामगार,

` म्युनिसीपालिटीमधील कामगार उत्साहाने घोषणा देत होते. या वेळचे एक दृश्य

'मी कधीही विसरणार नाही. वयाने बहुतेक साठी उलटलेली, पण अंगापिंडाने

भजबूत, पदर कमरेत खोचलेला, हातावर कोपरापर्यंत गोंदविलेले अशी एक बाई

तरूण मुलीला हात धरून नागपूर एक्स्प्रेसच्या डब्याकडे खेचून घेऊन जात

होती. जाता जाता घोषणाही देत होती. हसत होती. जास्त चौकशी करता

ही बाई वडाळयाला राहात होती असे समजले. ती, तिची सून, तिचा मुलगा

सगळे कुटुंबच्या कुटुंबच नागपूरला बुद्ध होण्यासाठी निघाले होते. स्पेशल ट्रेनने

था म्हणून तिची विनवणी अनेक कार्यकर्त्यांनी केली, समता सैनिक दलाच्या

लोकांनीही तिला विनंती केली, पण म्हातारीने- म्हातारी कसली ती ? ते साफ

नाकारले आणि “ मला पण तुमच्या दलात घ्या. ' अशी उलट तिने स्वयंसेवकांना

विनंती केली. शेवटी म्हातारी डब्यात चढलीच आणि दारात उभे राहून घोषणा

'देऊ लागली.

स्टेशनवर आलेल्या इतर मंडळीकडेही मी कुतूहलाने पाहात होतो, आणि ते

काय बोलतात ते लक्षपूर्वक ऐकत होतो. एका सुशिक्षित ब्राह्मणाची मुलगी

आपल्या नोकरीवर चाललेल्या नवऱ्याला निरोप देत होती. या घोषणांनी बिचारी

हैराण झालेली दिसली. काही कॉलेज विद्यार्थी आपसात '' हे काय बुवा आज

नवेच '' अशा भावनेने मिस्कील चेहरा करून पाहात होते. " अरे, डॉ. आंबेडकर

बुद्ध होताहेत '' असे त्यांच्यापैकी कोणीतरी सांगितले. फस्ट क्लासच्या

=डब्याजवळ कोणीतरी सन्माननीय काँग्रेस पुढारी उभे होते आणि त्रासिक मुद्रा

.करून घोषणा ऐकत होते. त्यांच्याजवळ घोळका करून त्यांचे काही चाहते उभे

“होते, त्यांना या महाशयांनी सुनावले ” अरे बुद्ध व्हा नाहीतर आणखी काही

व्हा. निवडणुकीची वेळ मात्र डॉ. आंबेडकरांनी बरोबर शोधून काढली अं ! ”

(वाय) ४११--३३