४९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
एका डब्यात शे. का. फे. चे मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पुढारी आणि कार्यकर्ते बसले होते. त्यांची चर्चा ऐन रंगात आली होती. मुंबईचे आमदार बी. सी. कांबळे व के. आर. पवार, वकील, पुण्याचे श्री. शंकरराव खरात, वकील, सिद्धार्थ कॉलेजमधील प्रो. करडक, अहमदनगरचे श्री. डी. टी. रूपवते, वकील ही मंडळी साधारणपणे माझ्या परिचयाची होती. पण त्यांच्या चर्चेमध्ये अडथळे यावयास नको म्हणून मी पलिकडच्या डब्यात जाऊन बसलो. गाडीत झोप कुठली ? प्रत्येक स्टेशनवर लोक येत होते. घोषणा चालू होत्या. कार्यकर्ते एकमेकांना मिठ्या मारीत होते. हसत होते. त्यांच्या उत्साहाला सीमा नव्हती. मनमाड स्टेशनवर तर इतकी गर्दी होती की, माणसाला उभे राहाण्याससुद्धा प्लॉटफार्मवर जागा नव्हती. गाडीतही जागा नव्हती. मागच्या स्पेशल ट्रेनने या, अशी कार्यकर्ते येणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. काही ऐकत होते, काही न ऐकताच डब्यात घुसत होते. घोषणा चालू होत्याच. :
तेरा तारखेला दुपारी सव्वातीन वाजता नागपूर मुक्कामी गाडी पोहोचली. स्टेशनवर शंभर तरी स्वयंसेवक असतील. महाराष्ट्र शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. दादासाहेब गायकवाड स्वत: स्टेशनवर हजर होते. स्वयंसेवक
- सर्वांची व्यवस्था पद्धतशीरपणे लावीत होते. स्टेशनबाहेर पडण्यास मला जवळ जवळ वीस मिनिटे लागली !
स्टेशनबाहेर रस्त्यावर, हातात पिशव्या घेतलेल्या, अंगात एक मळका सदरा, एखादी सुरकतलेली टोपी अशी हजारो माणसे दिसली. चौकशी करता समजले की आजुबाजूच्या खेड्यापाड्यातून हे हजारो लोक नागपुरी भाषेत बोलायचे म्हणजे “ येऊन राहिलेत. “ '' त्यांची उतरण्याची सोय कुठे केली आहे ?" मी स्वयंसेवकाला विचारले. '' गावातल्या बहुतेक सगळया प्राथमिक शाळांच्या इमारतींमधून यांची सोय केली आहे, पण ती अपुरी पडणार असा रंग दिसतो. "'
'' किती लोक समारंभासाठी येतील असे तुम्हाला वाटते ? "
'' अबब, त्ये कोन सांगणार ? दोन चार लाख तर सहज येतील. ”
मुंबईहून आलेल्या स्वयंसेवकात उत्कृष्ट शिस्त दिसली आणि अशा समारंभाचा त्यांना चांगला अनुभवही दिसला. स्टेशन बाहेर आल्याबरोबर त्यांचा शिस्तीत
“मार्च “ सुरू झाला. मधून मधून ते घोषणा देत होते. मी टॅक्सी ठरवली आणि हॉटेलमध्ये सामान टाकले. „ आंघोळ केली आणि वार्ताहराचे पॅड हातात घेऊन बाहेर पडलो.
नागपूर शहराला एक नवीनच स्वरूप आलेले दिसले. जिकडे माणसेच ! झुंडीच्या झुंडी चालल्या होत्या. चातुर्वर्ण्याच्या बाहेरी