४९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अखंड चर्चा
या सर्व निवासस्थानांमध्ये अखंड चर्चा चालू होती. कामगार-शेतकरी या वर्गातीलच बहुतेक लोक दिसत होते आणि चर्चा चालली होती तरी किती प्रकारे ? काही ठिकाणी गंभीरपणे, आता आपल्या गावातील मंडळी आणि '' बामण “ काय म्हणतील याची चर्चा चाललेली दिसली. काही ठिकाणी कोणातरी वृद्ध माणसाच्या "' पंढरीला “ जाण्याची थट्टा तरूण मंडळी करीत होती. काही ठिकाणी आपल्या गावातील भूतखेत आता पळून जातील अशी ग्वाही तरूण मंडळी बरोबर आलेल्या वृद्ध मंडळींना देत होती. एके ठिकाणी तर एक तरूण खेडूत आपल्या आईला '' आता कसं तुझ्या अंगात येतंय ते बघतो '' असे हसून सांगत होता, त्याची तरूण बहीण त्याला साथ देत होती आणि हसत होती. त्याची म्हातारी आईही त्याला हसून यापुढे आता माझ्या अंगात येणार नाही असे आश्वासन देत होती. एका १५ /२० लोकांच्या घोळक्यात स्वयंसेवकांच्या मदतीने मी घुसलो आणि त्यांच्या गप्पात सामील झालो. एक ` कट्टर आंबेडकरवादी तरूण गोष्ट सांगत होता ती जशीच्या तशी या ठिकाणी देण्याचा मोह मला आवरत नाही. “' आमच्या गावात महारवाड्याच्या एका टोकाला आहे म्हसोबा आणि दुसऱया टोकाला आहे मरीआई. आम्ही एकदा काय केलं, रात्री उदून मरीआईला म्हसोबाच्या जवळ टाकून द्यावयाची असे ठरविले. अर्थात गावातले हे (त्याने काही वृद्ध स्त्री-पुरूषांकडे बोट दाखविले) आमच्या फार विरूद्ध होते पण आम्हाला तर टिंगल करायची होती, म्हणून आम्ही असं उठविलं की, मरीआई म्हसोबाकडे चालत जात होती असे आम्ही पाहिले ! तिचे वर्णन केले, मळवट वगैरे तिने कसा भरला होता तेही सांगितले आणि महारवाड्यात, त्याचा परिणामही झाला. त्या दिवशी मरीआईचे तीन-चार दगड आम्ही रात्री उचलले आणि थोडे फार चालून गेलो नाही तोच कोणाची तरी चाहूल लागली, आम्ही मरीआईच्या दगडाला तिथेच टाकले आणि पळालो, दुसऱ्या दिवशी महारवाड्यात एकच कल्लोळ उडाला. पंचाक्षरी आला आणि मंत्र बडबडायला लागला, इतक्यात आमच्यापैकी एकाच्या डोक्यात अक्कल आली आणि तो म्हणाला, अरे, मरीआई फक्त रात्री चालते, तिला निघायला उशीर झाला आणि थोडी चालली नाही तोच पहाट झाली. त्याबरोबर ती आहे तिथेच पुन्हा दगड होऊन पडली, अहिल्येसारखी. ” गोष्ट संपली आणि सारे खो-खो हसत सुटले, आणि त्यात ते वृद्ध स्त्री-पुरूष सामील झालेले दिसले. शेवटी तो म्हातारा म्हणाला, “ आता गावी गेल्याबरोबर” ती मरीआई आणि-तो म्हसोबा, दोघांनाबी नदीत फेकून देऊ. आता बाबांची आज्ञाच अशी आहे. बाबा सांगतो तर आपल्याला मरीआईची बी जरूरी काय ? आणि म्हसोबाची बी जरूरी काय ? “