बुद्ध धर्मनेच जगाचा उद्धार होणार आहे ४९७
“ रेनायझन्स "' मला प्रत्यक्षात पाहावयास मिळत होता. मनुष्याने सत्कर्मरत व्हावे येवढेच, देवाची त्याला काहीही जरूरी नाही. देव नाही. सबझूट ! या निर्णयाला लाखो लोकांनी ; या सर्व तऱ्हेचे लोकभ्रम हाडीमाशी खिळलेल्या मारतात येणे म्हणजे काय साधी गोष्ट आहे ? जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी ती गोष्ट साध्य केलेली मला प्रत्यक्षात दिसली. |
यानंतर मी मंडपाच्या व्यवस्थेची माहिती तेथे जाऊन मिळविली. नागपूर येथे दक्षिण अंबाझरी रस्त्यावर अंधविद्यालयापलिकडच्या प्रशस्त पटांगणात बुद्धकालीन शिल्पानुसार भव्य स्तूप उभारण्यात आला होता. सुमारे ४/५ लाख लोक बसू
शकतील एवढा खुला मंडप होता.
या मंडपासमोर सडकेच्या डाव्या बाजूला दुकानांची ओळ लागलेली होती. एरवी निर्जन असलेल्या या पटांगणाला प्रचंड यात्रेचे स्वरूप आलेले दिसले. मंडपाचे काम गेले आठ दहा दिवस चालले होते. शेकडो अस्पृश्य बांधव त्या ठिकाणी श्रमदान करत होते. सुमारे ५० ते ७५ हजार रुपये या श्रमदानाने वाचविले आहेत. आता फक्त २५/३० हजार रुपये 'रोख दीक्षा समारंभाला लागतील असे कार्यवाह यांच्याकडून समजले. एकूण जवळ-जवळ १ लक्ष रुपये या दीक्षा समारंभाला खर्च होतील असा अंदाज आहे. ज्या स्तूपासमान व्यासपीठावरून बाबासाहेबांचा दीक्षा समारंभ झाला त्या ठिकाणी एक ` कायमचे स्मारक होणार असेही समजले. र
नवे धर्मक्षेत्र
नागपूर हे अस्पृश्य समाजाचे नवे धर्मक्षेत्र बनणार हे आता स्पष्ट ` दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाशी नागपूर हे प्रथमपासूनच निगडीत आहे. १९३० साली नागपूर जवळ कामठी येथेच डॉक्टरसाहेबांनी संयुक्त मतदार संघाला विरोध करून विभक्त मतदार संघाची मागणी केली. पहिले शे. का. फे. चे अधिवेशन नागपूरलाच झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूरलाच बुद्ध धर्माची दीक्षा घेत आहेत. ' नागपूर ' जवळच रामटेकच्या टेकडीत बौद्ध महापंडित नागार्जुनची गुहा आहे. पूर्वी हे शहर बौद्धांचे तिर्थक्षेत्र होतेच. आता परत नव्याने या. शहराला तेच महत्त्व प्राप्त होणार हे उघड आहे. या मंडपाच्या ठिकाणीच मला समजले की डॉक्टरसाहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. डॉ.माईसाहेब आंबेडकर हे तेथे. आलेले असून त्यांचा मुक्काम बर्डीवरील शाम हॉटेलमध्ये आहे. डॉ. साहेबांना दीक्षा देण्यासाठी काशिया (प्राचीन इतिहासात कुशीनारा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) गावाहून सुप्रसिद्ध ब्रह्मी बौद्ध भिक्षु चंद्रमणी महास्थविर हे आज नागपूरास आले आहेत, त्यांच्याबरोबर आणखीही पाचसहा बौद्ध भिक्षु आलेले आहेत. |