बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४९९
सकाळचे नऊ वाजले, जमाव वाढतच होता. मैदान जवळ जवळ पूर्ण भरलेले दिसले. वृत्तपत्र वार्ताहर अंदाज करू लागले. बहुतेक सर्वांच्या मते सुमारे पाच लाख लोक तरी जमले असावेत. परत शिट्टया वाजल्या. आणि एकच खळबळ उडाली. लाऊडस्पीकरवरून लोकांना शांत राहाण्याचे आदेश एकसारखे देण्यात येत होते. तीनचार मोटारी व्यासपीठाकडे येत होत्या. लाऊडस्पीकरचे आदेश मानण्याच्या मनःस्थितीत लोक नव्हते. " परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय " ही एकच घोषणा लक्षावधी मुखामधून होत होती. बरोबर सव्वा नऊ वाजले होते.आणि मोटारमधून उतरून दोन माणसांच्या खांद्यावर हात टाकून डॉ. बाबासाहेब हळूहळू स्टेजवर जात होते. "' पुरःस्सर गदासवे झगडता तनू भागली “ याचे हे मूर्तिमंत दृश्य होते. लक्षावधी लोकांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. डॉक्टरसाहेबांनी स्वत:चे शरीर अक्षरश: तिळ तिळ झिजवून अस्पृश्य समाजाला काही तरी बरे दिवस दाखविले. डॉक्टरसाहेबांच्या शत्रुंना देखील हे मान्य करावे लागेल. या वेळपावेतो डॉक्टरसाहेब आणि त्यांच्या पत्मी व्यासपीठावर चढून बसल्या होत्या. घोषणांचा पहिला पूर ओसरला होता. वातावरण परत शांत होत होते आणि मुख्य समारंभाला लवकरच सुरूवात होणार होती. डॉ. आंबेडकर यांनी शुभ्र रेशमी धोतर परिधान केले होते. त्यांच्या अंगावर तशीच शुभ्र शाल होती. त्यांच्या धर्मपत्नीनेही पांढरेशुभ्र वस्त्र धारण केले होते. व्यासपीठावर शेडयूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे बहुतेक पुढारी प्रामुख्याने दिसत होते."
(धर्मांतराच्या ऐतिहासिक घटनेचा वेध घेणारा बी. सी. कांबळे यांचा लेख प्रबुध्द
भारताच्या दि. २७-१०-१९५६ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तो इथे देणे
अप्रस्तुत होणार नाहीं. --संपादक)
ते लिहितात-
'' तारीख २३ सप्टेंबर १९५६ चे ऐतिहासिक निवेदन
या बौद्ध दीक्षा विधी समारंभाच्या माहितीची सुरवात तारीख २३-९-१९५६ पासून
करावी लागेल. या तारखेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील
२६, अलिपूर रोडच्या आपल्या निवासस्थानातून एक निवेदन जाहीर केले,” ते
निवेदन बिलकूल छोटे होते. जेमतेम .४-५ ओळींचा मजकूर त्यामध्ये
णाप्मवयन नवयुग : मंबई रविवार २१ ऑक्टोबर १९५६ त [| मुंबई, रविवार २१ ऑक्टोबर १९५६.
* प्रस्तुत निवेदन पृष्ठ क्रमांक ४८२ वर आहे.