बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५०१
व विशेषतः मानीव अस्पृश्य समाजास बौद्ध धर्माच्या आश्रयाशिवाय दुसरा काही परिणामकारक मुक्ततेचा मार्ग आहे काय याचाही पुन: पुनः त्यांनी पडताळा घेतला असेल व शेवटी त्यांची सर्व सद्सदविवेकबुद्धि केंद्रित होऊन परम निश्चयाने एकमेव सन्मार्ग म्हणून बौद्ध दीक्षा घेण्याचे जाहीर करणाऱ्या निवेदनावर सही केली असेल. मनोविश्लेषणाच्या दृष्टीने विचार केला तर ता. २३ सप्टेंबर १९५६ चा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अभूतपूर्व, हर्षयुक्त व निश्चयाच्या कसोटीला आपण उतरलो याचे अत्यंत उत्कट असे दर्शन घडविणारा ठरला आहे.
बौद्ध जगतावरील परिणाम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध दीक्षा घेण्याच्या निवेदनाचा चित्तवेधक परिणाम निदान भारतीय दलित वर्गात व जागतिक बौद्ध जनात झाला यात शंकाच नाही. बौद्ध जनांनी ब्रह्मदेश, सिलोन, जपान, नेपाल आदी देशांमधून या निवेदनाचे अत्यंत हर्षाने स्वागत केले. बौद्ध-दीक्षा-विधीसंबंधी, अखिल बौद्ध जगतातील जे संदेश आलेले आहेत त्यावरून ती गोष्ट बिलकूल स्पष्ट होते. या संदेशांशिवाय बौद्ध जनांनी सदर दीक्षा विधीबाबत जो बंधुभाव व्यक्त केला तो कृतीत दिसून आला. .ब्रह्मदेशाचे पूज्य भिख्खु चंद्रमणी महास्थवीर हे ८० वर्षाचे ! भारतातील सर्वात वृद्ध भिख्खु ! परंतु त्यांनी आपल्या प्रकृतिमानाकडे न पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध दीक्षा देण्यासाठी स्वतः येण्याचे मान्य केले व ते आलेही. त्यांच्या हस्तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध-दीक्षा-विधी पार पडला, याशिवाय, खालील बौद्ध भिख्खु सदर समारंभास होते.
(१) थेरो पन्नातिस, सांची विहार (भोपाळ)
(२) व्हेनरबल भिख्खु, एच. सिद्धतिस, सिलोन
(३) व्हेनरबल, एम. सौघरत्तना, सारनाथ (बनारस)
(४) भिख्खु जी. प्रज्ञानंद, बुद्ध विहार (लखनौ)
` (५) नेर श्रमनेर, धम्मोदय विहार (पश्चिम बंगाल)
| (६) रिव्हीरर्ड परमसंधी
पाच कोट बौद्ध
एवढे भिख्खु निरनिराळ्या देशातून व विभागातून आले ही सामान्य घटना
नव्हे. बौद्ध जगताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध दीक्षेबद्दल
आकर्षण वाटणे दोन दृष्टींनी स्वाभाविक आहे. एक कारण हे की,