१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 545

बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५०५

(बल्ब्स) व्यवस्था केली होती. स्त्रियांसाठी अर्ध्या भागात स्वतंत्र व्यवस्था एका छोट्या मंडपासह केलेली होती. पुरूषांकरिता राहिलेले सर्व मैदान होते. एरवी तसा नागपुरचा अंबाझरी रोड ओसाडच असतो. पण सदर समारंभामुळे, रोडवर निरनिराळ्या प्रकारची दुकानेच स्थापन झाल्याचे दिसून आले. लाल हाफ शर्टस्‌ घातलेल्या नागपुरच्या समता सैनिक दलाने मैदानापासून अलिकडेच चार फर्लांग एवढ्यावर अंबाझरी रोडचा बंदोबस्त ठेवला होता. मुंबईचे समता सैनिक दलही, मैदानातील समुदायाची व्यवस्था ठेवित होते. एवढी प्रचंड गर्दी पण, मध्यप्रदेशाचे पोलीस क्वचित्‌ कोठे तुरळक १०/११ पाहावयास मिळाले. बाकी, शांतता व सुव्यवस्था स्वयंसेवकांनीच ठेवली होती.

नागपूरातील धमाल

. नागपूर शहर ता. १४ ला तीनलाच जागे झाले असे म्हणावयास हरकत नाही. सुमारे ४ लाख लोक तरी, नागपूर बाहेरून आलेले होते. त्यांची व्यवस्था, नागपूर शहरातील जेवढ्या शाळा, हायस्कूल आहेत, त्यांच्या इमारतीत (सुटीत रिकाम्या असल्याने) करण्यात आली. या संस्थांच्या चालकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. परंतु एवढ्या प्रचंड लोकसंख्येस, शाळा हायस्कूलच्या इमारती कितीशा पुरेशा पडणार ? पहाटे ३ पासूनच मिरवणुकांना व घोषणांना सुरुवात होऊन, नागपूर जागे झाले. अंबाझरी रोडला एकच एक गर्दी सकाळपासून लोटली होती. ` खुद्द नागपूरकरच असे म्हणत होते की, या प्रकारचा लोकसमुदाय व उत्साह आजपर्यंत नागपुरात इतर कोणत्याही समारंभात दिसून आला नाही. एवढ्या प्रचंड गर्दीचा परिणाम व्यापारी नागपुरावर झाला. रिक्षा, जेवणे, यांचे दर दुप्पट वाढण्यातही दोन दिवसात घडून आला. या समारंभाची व्यवस्था व जबाबदारी भारतीय बौद्ध महासभा, नागपूर शाखेने घेतली होती व प्रामुख्याने ती जबाबदारी श्री. कवाडे, श्री. गोडबोले, श्री. पंचभाई आदिंनी पार पाडली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे उचितच होईल.

हृदय भेदक प्रसंग

या बौद्ध दीक्षा घेण्याच्या विधीतील सर्वात अगदी हृदयास भिडणारा परमोच्च प्रसंग नमूद केला पाहिजे. तो प्रसंग हा की, ज्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुष्यमात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो असे म्हणाले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. डॉ. बाबासाहेब