५०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आंबेडकरांना कोणते दुःख झाले असले पाहिजे ? त्यांच्यासारख्या असामान्य निश्चयाच्या या महापुरूषाच्या नेत्रातून अश्रू का यावे ? डॉ. बाबासाहेबांना असे वाटले असण्याचा संभव आहे की, मी ज्ञान मिळविण्याची पराकाष्ठा केली, उत्कृष्ट चारित्र्य ठेवले, वैयक्तिक लाभाची पर्वा केली नाही, अनेक ग्रंथ लिहून भारताच्या ' विचारात ' भर घातली, ब्रीदाने जीवन घालविले, म्हणजे ज्ञान, शील व सचोटी याबाबतीत मी कोणापेक्षा कमी नसता व गेली ३० वर्षे हिंदू धर्म समाजरचनेत राहिलो, पण केवळ, माझ्या दलित बांधवांना इज्जतीचा व स्वतंत्र बाण्याचा मार्ग दाखवितो म्हणून हिंदुंनी कोणत्या प्रकारच्या कारवाया करून माझे मार्ग बंद करण्याचे कार्य अव्याहतपणे ठेवले ? त्यांना याबाबत साध्या माणुसकीचीसुद्धा आठवण राहिलेली नाही. तेव्हा मी व माझ्या बांधवांनी असे कोणते पाप केले की, त्यांच्यामध्ये राहूनही ते आम्हास साध्या माणुसकीने राहू देत नाहीत. काहीही असो या अतिशय बिकट परिस्थितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आता आपल्या दलित बांधवांना दाखविला, तो पूर्ण ' स्वतंत्र ' बाण्याचा सर्वोत्कृष्ट आहे यात शंकाच नाही."
'' भारत सरकार फिल्म घेणार
अस्पृश्य समाजाच्या इतिहासातील ही एक महत्त्वपूर्ण घटना असल्यामुळे भारत सरकारतफे या समारंभाची पूर्ण डॉक्युमेन्टरी फिल्म घेण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणही रेकॉर्ड केले जाणार आहे.
जगाचे डोळे लागले
नागपूरातील आणि नागपूरात बाहेर गावाहून आलेला. हजारोंच्या संख्येतील अस्पृश्य समाज या भव्य धर्मचक्रप्रवर्तन समारंभाची तहानभूक विसरून उत्कंठेने प्रतिक्षा करीत आहे यात नवल नाही, सर्व जगाचे डोळे आज या समारंभाकडे लागले असून, सर्व देशांचे वार्ताहर येथे आलेले आहेत." २ |
'' बौद्ध दीक्षेचा सोहळा
समारंभासाठी १४ एकर क्षेत्राचे पटांगण सभोवार तट्ट्या मारून तयार केले होते. एकूण तीन मंडप होते. मधील मंडप सुमारे ४०' < २०' होता, त्याजवर बौद्धकालीन स्मृती दर्शविणारा स्तूप उभारण्यात आला होता, या मध्यवर्ती
* प्रबुद्ध भारत : डॉ. आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक, २७ ऑक्टोबर, १९५६.
° दैनिक ' तरुण भारत ' नागपूर : १५ ऑक्टोबर १९५६.