बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५०७.
मंडपातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध -दीक्षा-विधी करण्यात आला. दोन्ही बाजूच्या मंडपापैकी एक स्त्रियांकरिता व दुसरा, प्रमुख नागरिकांसाठी होता. मध्यवर्ती मंडपासमोर वृत्तपत्रांच्या वार्ताहरांकरिता खास बसण्याची सोय केली होती. स्वदेशी व परदेशी मिळून जवळजवळ ३० वार्ताहर व फोटोग्राफर्स हजर होतै. मंडपावर व विस्तीर्ण पसरलेल्या मैदानात ठिकठिकाणी बौद्धधर्मी निशाणे फडकत होती. निळा, तांबडा, हिरवा असे पट्टे असलेली ती निशाणे होती.
५ लाखांवर उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महास्थविर भिख्खु चन्द्रमणी यांचेसमवेत सकाळी साडे नऊला समारंभ स्थळी आले. तोपर्यंत संपूर्ण मंडप भरून गेला होता. अदमासे ५ ते ६ लक्षापर्यंत जनसमुदाय उपस्थित झाला होता. त्यापैकी जवळ जवळ ३ ते ४ लक्ष लोक बाहेर गावचेच होते.
त्यावेळी ' भगवान बुद्ध की जय ' ' बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्मका करो स्वीकार ' अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
व्यासपीठावर अग्रभागी एका मेजावर बुद्धाचा ब्राँझचा पुतळा ठेवण्यात आला होता व त्याचे दोन्ही बाजूला एकेक सिंह होता व समोर उद प्रज्वलित होत
होता. |
बाबासाहेबांच्या पिताजींच्या पुण्यतिथीचे स्मरण
समारंभास कु. इंदुताई वराळे यांनी स्वागत पद गाऊन सुरवात केली, तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पिताजी, कै. रामजी मालोजी आंबेडकर यांची पुण्यतिथी दिनांक १४-१०-१९५६* रोजीच असल्यामुळे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व पाच लाखांवरील जनता काही मिनिटे स्तब्ध
राहिली.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सुभेदार, दिनांक २ फेब्रुवारी १९१३ रोजी
सायंकाळी दिवंगत झाले असे डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र-चां. भ. खैरमोडे, खंड- १, पृ. ६३
तसेच धनंजय कीर लिखित Dr. Ambedkar : Life and MiS5i0n या ग्रंथात पृ. २४ वर
दर्शविलेले आहे. यानुसार त्यांची पुण्यतिथी १४ ऑक्टोबर रोजी नव्हती. दीक्षा विधी
अगोदर त्यांचे स्मृतीस अभिवादन पुण्यतिथी असल्यामुळे केले नसून त्यांनी केलेल्या कार्यावरून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील या एका महान क्रांतिकारी घटनेच्याप्रसंगी केले
असावे. -संपादक