१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 548

५०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नंतर डॉ. बाबासाहेब व माईसाहेब यांनी पूज्य चंद्रमणी यांच्यासमोर उभे राहून, भगवान बुद्धाच्या मुर्तिपुढे आपले हात एकत्रित जोडून,

नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस

(अर्थ :- त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो ; की, जो जीवन मुक्त, संपूर्ण व जागृत आहे.)

असे पाली भाषेत लागोपाठ तीन वेळा म्हटले. पुढे पूज्य चंद्रमणी यांनी उभयतांना खालील पाली भाषेतील सरणत्तयं (तीन अनुसरणे), पन्चसीलानी (पाच शीले) म्हणावयास सांगून ती म्हणवून घेतली

सरणंत्तयं (तीन अनुसरणे)

बुद्धं सरणं गच्छामि ॥

धम्मं सरणं गच्छामि ।।

संघं सरणं गच्छामि ||

दुतियम्पि, बुद्धं सरणं गच्छामि ।!

दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ॥

दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ।॥

ततियम्पि, बुद्धं सरणं गच्छामि ।।

ततियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ||

ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ॥

(अर्थ :-मी बुद्धाला अनुसरतो.

मी त्याच्या धर्माला अनुसरतो.

मी त्याच्या संघाला अनुसरतो.

दुसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो.

दुसऱ्यांदा मी त्याच्या धर्माला अनुसरतो.

दुसऱ्यांदा मी त्याच्या संघाला अनुसरतो.

तिसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो.

तिसऱ्यांदा मी त्याच्या धर्माला अनुसरतो.

तिसऱ्यांदा मी त्याच्या संघाला अनुसरतो.)