१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 549

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ५०९

पन्चसीलानि । (पाच शीले)

पाणातिपाता वेरमणी -

सिक्खापदं समादियामि ।!१।|

| अदिन्नादाना वेरमणी ~

सिक्खापदं समादियामि ।।२।।

कामेसु मिच्छाचारा वेरमणी -

सिक्खापदं समादियामि ।।३॥

मुसावादा वेरमणी -

सिक्खापदं समादियामि 1४1

सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठाना वेरमणि -

डी सिक्खापदं | समादियामि ।।५।।

(१) १) मी जीवहिंसेपासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो

(२) २) मी चोरी करण्यापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो

(३) मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो

(४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो

( [) ] [मी ] [मद्य, ] [मादक ] [तसेच ] [इतर ] [सर्व ] [मोहात ] [पाडणाऱ्या ] [मादक ] [वस्तूंच्या ] सेवनापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो. |

बुद्धाच्या चरणी

शेवटी उभयतांनी, भगवान बुद्धाच्या प्रतिमेस स्वच्छ कमलांचा पुष्पहार अर्पण केल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात आपले मस्तक भगवान बुद्धाच्या चरणी ठेवून तीन वेळा वंदन केले.

तद्नंतर डॉक्टरसाहेब म्हणाले, |

भगिनींनो व बंधुजनहो, आम्ही दोघांनी तुमच्यासमोर भिक्खु चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माचा अनुग्रह केला आहे. चंद्रमणी हे भारतातील सर्वात वयस्क

भिक्खु आहेत. आता आमचा जो बौद्ध धर्म अनुग्रह झाला ती पाली भाषेत

झाला. त्या अनुग्रहाचे मराठी भाषांतर करून, पुनः अनुग्रह घेत आहे.

* प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : २७ ऑक्टोबर १९५६, पृ. ३४.

वि (वाय) ४११--३४