१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 550

५१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

'' यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गंभीर वाणी लाऊडस्पीकरवरून ऐकू आली :

' बंधु भगिनीनो, अनुग्रह आता तुम्हाला मराठीतही समजला आहे. आता मी तुम्हा सर्वाना बुद्ध धर्माची दीक्षा देणार आहे. ज्यांना हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारावयाचा आहे त्यांनी कृपा करून उभे राहावे आणि माझ्यामागून शब्दांचे उच्चारण करावे. '

सर्वच्या सर्व समाज, म्हणजे सुमारे पाच लाख लोक उभे राहिले, फक्त आम्ही काही वार्ताहरच याला अपवाद होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा गंभीरपणे दिली.

तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाविधीचा एक भाग म्हणून बावीस प्रतिज्ञा दीक्षार्थीकडून वदवून घेतल्या "^ त्या पुढीलप्रमाणे-

“ बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा असे म्हणून त्यांनी खालील प्रतिज्ञा घेतल्या.

(१) मी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

(२) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

(३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदुधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

(४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विशवास नाही.

(५) बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.

(६) मी श्राद्धपक्ष करणार नाही ; पिंडदान करणार नाही.

(७) बौद्ध धम्माच्या विरूद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही.

(८) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.

(९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.

(१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.

(११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. .

(१२) मी बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.

` नवयुग : २१ ऑक्टोबर १९५६.