१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 551

बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५११

(१३) १३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.

(१४) १४) मी चोरी करणार नाही.

(१५) मी खोटे बोलणार नाही.

(१६) मी व्यभिचार करणार नाही.

(१७) मी दारू पिणार नाही.

(१८) मी प्रज्ञा शील आणि करूणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून माझे जीवन चालविन.

(१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो.

(२०) बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

(२१) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.

(२२) इतःपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

हा संपूर्ण समारंभ सुमारे ५० मिनिटे चालू होता. स्वतः बाबासाहेब आंबेडकर ` आणि सौ. माईसाहेब यांचा दीक्षाविधी ९-४० ते ९-४५ या पाच मिनिटात झाला. बौद्ध धर्मदीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर १० वाजता सामुदायिक दीक्षाविधी झाला व

' सरणां ' च्या त्रिवार घोषणेनंतर ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ' चा निनाद वातावरणात घुमला.

यावेळी अ. भा. महाबोधी समितीचे सरचिटणीस श्री. वलीसिन्हा यांनी बाबासाहेबांना एक चिकण मातीची बुद्ध प्रतिमा भेट म्हणून दिली. |

बौद्ध धर्माची दीक्षा ज्यांनी घेतली त्यात पुढील प्रमुख व्यक्तींचा समावेश होतो. बॅ. राजाभाऊ खोबरागडे (शे. का. फे. चे सरचिटणीस), महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष श्री. भा. कृ. गायकवाड, श्री. आर. डी. भंडारे (अध्यक्ष, मुंबई प्रदेश फेडरेशन), शांताबाई दाणी, श्री. सी. एन. मोहिते, श्री. गो. ति. परमार (गुजरात शाखेचे अध्यक्ष), श्री. वा. कां. परमार, श्री. डी. जी. जाधव, सौ. सरोजिनी जाधव, पुण्याचे श्री. वि. रा. रणपिसे, श्री. ससालेकर, श्री. हरिदास आवळे, श्री. सदानंद फुलझेले, श्री. अहोटे, श्री. व्ही. एस. पगारे, श्री. उपशाम, श्री. बी. एस. मोरे, श्री. बी. एच. वराळे, श्री. धोंडीराम पगारे, श्री. यशवंतराव आंबेडकर (बाबासाहेबांचे पुत्र), श्री.मुकुंदराव आंबेडकर, श्री. बी.सी.कांबळे वगैरे.

| वि (वाय) ४११--३४-३अ यक