५१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
याचवेळी न्या. भवानीशंकर नियोगी, श्री. कुलकर्णी (बुद्ध समितीचे चिटणीस), औरंगाबादच्या मिलिद कॉलेजचे प्रिन्सिपाल श्री. एम. व्ही. चिटणीस, श्री. बी. एस. कबीर आदि सवर्ण हिंदुंनीही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
सकाळचा हा कार्यक्रम ११ वाजेपर्यंत चालू होता. नंतर रात्री औरंगाबादच्या मिलिद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ' युगयात्रा ' या नाटकाचा चांगला प्रयोग करून दाखविला. त्यावेळी सौ. माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या.
थोरांचे शुभ संदेश !
डॉ. बाबासाहेबांच्या बौद्ध-दीक्षा-विधीनिमित्ताने ब्रह्मदेशाचे पंतप्रधान यू. बा. स्वे, तसेच माजी पंतप्रधान यू. नू., पूर्व पाकिस्तान बुद्धिस्ट कॉन्फरन्सचे पूज्य प्रियदर्शी सिहाबिर, आंध्रा बुद्धिस्ट असोसिएशन अध्यक्ष पी. बी. सेनागुप्ता, बौद्ध धर्मकुंवर सभेचे (कलकत्ता) डॉ. अरविंद बारुआ, एम्, ए., पीएच.डी., बार अँट-लॉ, कोलंबोचे एच. डब्ल्यू. अमरासुरीया, रंगूनचे महाथेरो पन्नलोक, कोझिकोडे येथील महाबोधी बुद्धिस्ट मिशनचे भिख्खु धर्मानंद वगैरे अनेक थेरो, बौद्ध भिक्खु व महापुरुषांचे संदेश आले. दीक्षाविधी संपल्यानंतर बाबासाहेबांचे अभिनंदन आणि अभीष्टचिंतन करणारे संदेश वाचून दाखविण्यात आले. त्यापैकी काही निवडक संदेश संक्षेपाने दिले आहेत.
ब्रह्मदेशाचे पंतप्रधान यू. बा. स्वे व माजी पंतप्रधान, यू. नू. आपल्या संदेशात म्हणतात :--
'“' पंतप्रधान यू. बा. स्वे व माजी पंतप्रधान यू. नू. या दोघांनाही तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धदीक्षा विधी समारंभाचे निमंत्रण मिळाल्याबद्दल आनंद वाटतो. दोघांवरही अनेक कामांची जबाबदारी असल्यामुळे, त्यांना नागपूर येथे तारीख १४ आक्टोबर रोजी हजर राहाता येत नाही याबद्दल खेद होतो. मात्र, यू. बा. स्वे व यू. नू. हे दोघेही सदर समारंभास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशूभ इच्छितात व डॉ. आंबेडकर यांना धन्यवाद देतात. डॉ. आंबेडकरांचा बौद्ध-धर्म-दीक्षाविधी समारंभ अपूर्व आहे. त्यांना भारतात तसेच ब्रह्मदेशातही आदरयुक्त भावनेने मानले जाते, "' |
कोलंबोचे एच. डब्ल्यू. अमारसूरिया आपल्या संदेशात म्हणतात :-
तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी चहाते, बौद्ध धर्म दीक्षा घेणार असल्याचे वाचून अत्यानंद झाला. १४ ऑक्टोबर हा जगामधील सर्व बौद्धजनांना सुवर्ण अक्षराने लिहून