१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 553

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ५१३

ठेवावा लागेल यात संशय नाही. आधीच्या माझ्या कार्यामुळे नागपूरला येऊ

शकत नाही, याबद्दल मला खेद वाटतो. डॉ. आंबेडकर यांचे मी हार्दिक

अभिनंदन करतो. सर्वसाधारण अखिल बौद्ध जनात, बुद्ध शासनास उच्च

दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी व विशेषतः शास्त्रोक्त पायावर भारतात बुद्ध

शासन पुनश्च: प्रस्थापित करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांना दिर्घायूष्य

लाभो. "'

डॉ. अरविंद बारुआ (एम. ए., पीएच.डी., बार अंट-लॉ.) कलकत्त्याहून

पाठविलेल्या संदेशात लिहितात :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी बौद्ध दीक्षा घेऊन बौद्ध जगात

समाविष्ट होत आहेत, त्यांचे मी मन:पूर्वक स्वागत करतो. डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा घेण्याबाबत घेतलेला निर्णय अक्षरशः युगप्रवर्तक

आहे. त्यांचेबद्दल मला परम आदर आहे. बौद्ध धर्मास पुनः उच्चपदी नेण्यास

व सांप्रतची धर्मग्लानी दूर करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या

दैदिप्यमान व्यक्तिची जगातील बौद्धजनास आज फारच आवश्यकता

आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्त्वाने व प्रज्ञेने ते जगातील बुद्ध शासनाचा आदर

मिळवतील अशी माझी खात्री आहे आणि त्यांनी आता या महान कार्यासाठी पुढे

यावे अशी माझी विनंती आहे.

१४ ऑक्टोबर १९५६: च्या नागपूरच्या शुभप्रसंगी, मी डॉ. बाबासाहेब

आंबेडकरांच्या थोर शिकवणुकीशी निष्ठा व त्यांच्या अनुयायांशी शुद्ध बंधुभाव

अंतःकरणपूर्वक व्यक्‍त करतो. ”

रंगूनचे महाथेरो, यू पन्नलोक आपल्या संदेशात म्हणतात :-

डॉ. आंबेडकर व त्यांचे अनुयायी ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी

बौद्ध दीक्षा घेऊन, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीच्या तीन आश्रयाखाली ` येणार हे समजल्यावर हर्ष झाला. त्यांना सर्वांना मी शुद्ध व मुक्त जीवन _ चिंतितो. भगवान बुद्धाचे अष्टमार्ग सर्वानी अनुसरावे व मानवमात्राचे दुःख नष्ट करून खऱ्या शांततेचे प्रतीक ' निर्वाण ' त्यांना प्राप्त व्हावे असे

` प्रार्थितो." †

oS

प्रबुद्ध भारत-डॉ. आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : २७ ऑक्टोबर, १९५६ पृ. २९-३१.