बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५१९
प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव , जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही,
मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते ? त्याची कारणे ही की त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहात नाही? त्याचे पहिले कारण हे की मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही ; अगर आशा राहात नाही. त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार ? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते, त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला, की कोण रे हा? हा तर महार ! आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार ? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे ? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा-पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम ! अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार ? त्याची उन्नती ती काय होणार ? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे, ज्याचं शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्त्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरूत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक होतील. या पलिकडे दुसरे काय होणार ? या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकून
पाहिजे.
मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन ! तुम्हाला मिलचे मालक
माहीत आहेत. ते गिरण्यावर मॅनेजर नेमतात व त्यांच्याकरवी मिलमधील काम
करवून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात,
त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला
उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली, तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले. मी
लंगोटी घालून शिक्षणाला सुरूवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा
मिळाले नाहीं. पाण्याशिवाय शाळेत मी किती तरी दिवस काढले ! मुंबईसारख्या
एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती
असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार ? कारकुनीच निर्माण होईल ! |
मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिन्लिथगो
व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण