बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५२१
` करावी. त्यांना शिक्षण कशाला ? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल ? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे, शूद्रांचे काय ? तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय ? चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही ; ही रूढी नाही ; हा धर्म आहे. ॒
हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले मी चातुर्वर्ण्य मानतो. मी म्हणालो, तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण्य . मानतात ! पण हे चातुर्वर्ण्य कोणते व कसे ? (हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून) हे चातुर्वर्ण्य उलट की सुलट ; चातुर्वर्ण्याची सुरूवात कोणीकडून व शेवट कोठे ? गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय ? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल ! हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्टधर्म आहे.
आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला ? युरोपमध्ये १९४५ पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रुट भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले. नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे ! क्षत्रिय मेले की आम्ही खलास ! आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते !
हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे. पण इतरांचे काय ? ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार ? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल.
बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिक्षु होते. २५ टक्के शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले. ” हे भिख्खुहो, तुम्ही निरनिराळया देशातून व जातीतून आला आहात. आणल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक
असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहात नाहीत. त्या एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान “ ! सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी