१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 563

बुद्ध धमनिच जगाचा उद्धार होणार आहे ५२३

असत. ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत-चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील ते पाहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहाणार नाही. (टाळ्यांचा कडकडांट) आता घरातल्या घरात (भारतात) हे पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा ; जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच ! तेव्हा ह्या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील ?

आमच्या वाटेने आम्ही जाऊ ; तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग _

- आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथलाच आहे, भारतातीलच आहे. या देशामध्ये २०००. वर्ष बौद्ध धर्म ` होता. खरे म्हणजे, या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही, याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. |

बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या. बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिऊन बौद्ध भिख्खु नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले; कोणी चीनला गेले ; कोणी कोठे गेले ! धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिद. हा राजा सदोदीत वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. तो हिंदुंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद [करावा. ] त्याने पुष्कळांना निरूत्तर

केले होते. न

एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व

वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले.

तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध

जनांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण

होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला

माहीत आहे. त्या पुस्तकाचे नाव ' मिलिंद पन्ह* आहे. मिलिदाने असा प्रश्‍न

विचारला की धर्मास ग्लानी का येते ? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची

तीन कारणे सांगितली.