५२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे .
पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वात
गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो.
दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी
होते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद
करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.
आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत
व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठं
विभूतीचे पूजन करतात.
आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज दोन हजार पाचशे वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदीर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन, चार हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्त्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धानी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धानी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही.
बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे ? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायु, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे ! खिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस ०8४ ० ५८५9७०१ असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धानी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे; ९० टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दु:खातून पिडलेल्या, गरीब माणसांना ' मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले ? भगवंतानी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितले
नाही.
बंधुंनो, मला सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्त्वप्रणाली आहे