१४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे - Page 566

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५२६

बौद्ध दीक्षा यश हा दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या ४० मित्रांनी घेतली.

हा कसा आहे ? तर श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, धर्म

शि र हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याणं, मध्य

कल्याणं, पर्यावसान कल्याणं ” त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या

धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपणालाही यंत्रणा तयार करावी

लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध

माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो. **

प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : २७.ऑक्टोबर १९५६.