१५-१०-१९५६ मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे - Page 567

३४३
मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी
माझी शक्ति वेचणार आहे

मध्य प्रदेश दलित फेडरेशन शाखेच्या वतीने, ता. १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ, नागपूर मधील श्याम हॉटेल मध्ये छोटीशी चहा पार्टी देण्यात आली होती. या समारंभास सौ. माईसाहेब होत्या. शिवाय, दलित फेडरेशनचे पदाधिकारी व. कार्यकर्त्यांपैकी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, श्री. दादासाहेब गायकवाड, श्री. हरिदास आवळेबाबू, श्री. मेश्राम, श्री. कुंभारे, श्री. गोंडाणे, श्री. जी. टी. परमार (गुजरात),

श्री. ए. जी. पवार, श्री. आर. डी. भंडारे व श्री. बी. सी. कांबळे वगैरे हजर होते.

प्रथम श्री. हरिदास आवळेबाबू यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजर राहून उपकृत केल्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आभार मानले नंतर, दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शनपर दोन शब्द सांगावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विनंतीस मान देऊन, कार्यकर्त्यांना उपदेशपर असे भाषण हिंदीत' केले. ते म्हणाले, | |

या ठिकाणी मला भाषण करावे लागेल याची काही कल्पना नव्हती. तशी कल्पना असती तर माझे विचार संकलित करून मांडणे सोईचे झाले असते. एकंदरित मला असे दिसते की तुम्हाला राजकारण फार प्यारे आहे. कोणत्याही गोष्टीपेक्षा राजकारणाची तुम्हाला अधिक आवड दिसते. माझे तसे नाही. मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्‍ती वेचणार आहे. | वा

तुम्हाला काही खास अधिकार मिळवून देण्यासाठी मी आजवर खूप प्रयत्न केले. . ते अधिकार मिळवून देण्यासाठी मी गांधींशी झगडा केला, कॉंग्रेसशी सामना दिला. त्यावेळी प्रथमतः त्यावेळच्या मुंबई असेंब्लीत आमचे १५-१६ लोक निवडून आले. असेंब्लीत सरकार विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम केले. ते एवढे वाखाणण्यासारखे होते की असेंब्लीमधील आदर्श विरोध म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. खेर यांना उद्गार काढावे लागले. त्या काळानंतर लढाई आली. लढाईच्या काळात काही विशेष करता आले

नाही.

प्रबुद्ध भारत-आंबिडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : २७ ऑक्टोबर १९५६.

`वि (वाय) ४११--३५-अ सत्य