आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५२८
जातेवेळी आपल्या राखीव ` आपला देश स्वतंत्र झाल्यावर राज्यघटना घडविली
जागांकरिता स्वतंत्र मतदार अधिकारांचा विचार झाला. काँग्रेसवाल्यांना राखीव
संघ मान्य नव्हता. तेव्हा जे वारे वाहत होते ते संयुक्त मतदार संघाचे होते. याचाही प्रयोग करून पाहावा, असे पुष्कळांना वाटले. चोराची लंगोटीदेखील सोडू नये म्हणतात, त्याप्रमाणे राखीव जागा सोडून न देता त्यांचा संयुक्त मतदार संघाने प्रयोग करावा असे वाटले. पण आता असा अनुभव येऊन चुकला आहे की, काँग्रेसच्या तिकिटावर राखीव जागेवर जी माणसे येतात ती आपली तोंडे बंद करून बसंतात. अशा तऱ्हेने संयुक्त मतदार संघामुळे जर गधे लोक निवडून येत असतील तर निवडणुकांचा व जागांचा उपयोग तरी काय ? त्यांचा काही उपयोग होत नाही हे अनुभवाने आता सिद्ध
. झाले आहे.
राखीव जागा नकोत म्हणून फेडरेशनने ठराव केला आहे. त्या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो. त्या ठरावापासून ढळण्याची माझी इच्छा नाही. राखीव जागा १० वर्षासाठी आहेत. त्या जागा आता या निवडणुकानंतर राहाणार नाहीत. आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. या राखीव जागा गौण आहेत.
आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान अवश्य निर्माण ` केला. ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे. त्यामुळे संघटना झाली. तथापिं त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली. दुसरे लोक आम्हाला मत देत नाहीत व आपण लोक त्यांना मत देत नाही, ही एक प्रकारची तटबंदीच होय. दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे. आपण केवळ अल्पसंख्यांक आहोत. अशा परिस्थितीत फेडरेशन. आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण
आहे. |
यासाठी इतर समाजातील आमचे दु:ख जाणणारे कोण आहेत हे पाहिले पाहिजे. अशा सर्वांना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिद्धता पाहिजे. अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या प
आपल्याशिवाय इतरांनाही दार मोकळे राहील.
तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते. ती ही क आज झाड लावले की त्यास दुसऱ्या दिवशी फळ खावयास आले पाहिजे, अच लोकांना वाटते. राजकारणात अशी अपेक्षा धरणे चूक आहे.