१५-१०-१९५६ मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे - Page 569

मला धर्म जास्त प्यारा . . . . . शक्ति वेचणार आहे ५२९

इंग्लंडमधील राजकारण घ्या. तेथील ब्रिटिश मजूर पक्षाचा इतिहास काय

सांगतो. १९०० साली त्यांचे फक्त दोन लोक पार्लमेंटात निवडून आले. १९०६ साली त्यांना सुमारे १४ जागा मिळाल्या. १९२४ पर्यंत त्यांना विशेष यश

नव्हते. त्या साली मात्र त्यांचे जवळजवळ १२५ लोक निवडून तो खरा विरोधी

पक्ष बनला. अशा तऱहेने राजकारण हा दमाचा व धीराचा खेळ आहे. ज्यांना

दम, धीर नाही त्यांना राजकारण करता यावयाचे नाही.

आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले

पाहिजे. तुमच्यात तुम्ही फूट ठेवून चालणार नाही. माझ्या दबदब्यामुळे अजून

काही वेडेवाकडे घडत नाही. पण मी तुम्हासाठी कोठपर्यंत राहाणार ?

आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनीच केले पाहिजे. लोकांमध्ये तुम्ही ` काम केले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली

पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाशी समरस होण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.

मी भंडाऱ्यातील निवडणुकीमध्ये पडलो त्याचे मला कधी वाईट वाटले नाही. तरी त्या निवडणुकीत मला बरीच मते पडली. आपली मते सोडली

तर इतर समाजाने देखील मला मते दिलेली आहेत. ही गोष्ट माझ्या

समाधानाची आहे. मी पडलो की निवडून आलो हा प्रश्‍न मी विचारात घेत नाही. तुम्हीही अशाचप्रकारे कर्तबगार होण्याचा प्रयत्न. करून, इतर समाजास देखील तुम्हास मते द्यावीत असे वाटले पाहिजे. माझी खांत्री आहे की या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन व कार्यक्रम चालवाल यापेक्षा आता अधिकं काही मी सांगत नाही

शेवटी श्री. हरिदास आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हार्दिक आभार मानले व बाबासाहेबांच्या उपदेशाप्रमाणे आम्ही वागू असे आश्‍वासन त्यांनी व्यक्त केले व चहापार्टी समाप्त झाली.