१५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते - Page 570

३४४ |
राजकारणात भक्तीला विभूतीपूजेचे रुप आले
सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते

'' ता. १५ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर कार्पोरेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कारास नागपूर शहरातील सर्व नगरपिते व प्रतिष्ठित नागरिक हजर होते. सत्कारासाठी खास मंडपही तयार करण्यात आला होता. सदर समारंभ, संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान पार पडला. सभा मंडप गच्च भरून गेला होता. बाहेर रस्त्यावर दोहो बाजूस प्रचंड गर्दी लोटली होती.

प्रथम नागपूर कार्पोरेशनचे मेयर (महापौर) श्री. रा. पै. समर्थ यांनी छापील.

मानपत्र वाचून दाखविले. ते मानपत्र असे,

मानपत्र

भारतीय पददलित जनतेच्या मूक भावनांची साकारमूर्ती

सन्माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर

एम. ए., पीएच्‌. डी., डी. एसूसी., बार अंट-लॉ.

आपल्यासारख्या समाजसुधारक, तत्त्वज्ञ व विधिज्ञ पंडिताचे स्वागत करण्याची संधी नागपूरच्या जनतेस लोभली याबद्दल आम्हास परमहर्ष होत आहे.

तसे पाहिले तर नागपूर शहराशी आपल्या जीवनाचा अत्यंत घनिष्ट संबंध आला आहे. महान परिश्रमाने विद्यासंपन्न झाल्यानंतर याच नगरीत आपण १९३० साली दलित जनता परिषद भरवून, देशातील दलित समाजाला मार्गदर्शन केले आहे -व आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला प्रारंभ केला आहे. याच नगरीत १९४२ साली अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनला जन्म देऊन पददलित समाजाच्या राजकीय आकांक्षांचा निनाद आपण साऱ्या भारतात प्रथम दुमदुमविला आहे आणि आज याच नगरीत आपल्या उत्तर जीवनात बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आपण आपल्या नवीन जीवनाला प्रारंभ करीत आहात.

आपल्या अष्टपैलू जीवनाकडे दृष्टीक्षेप केल्यास असे दिसून येईल की, आपला पिंड प्रगाढ पंडिताचा असला तरी तो नुसत्या तार्किक विवेचनात गुरफटून न ठेवता प्रत्यक्ष कर्तव्यसृष्टीत उतरविला आहे. शतकानुशतके धार्मिक, सामाजिक व. आर्थिक अशा सर्वच बाबतीत पिळवटून निघालेल्या अस्पृश्य समाजाच्या मूक व करूण किंकाळ्यांनी आपल्या हृदयाला पाझर फुटून आपण त्यांच्या सेवेचे असिधाराव्रत स्वीकारले.