१५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते - Page 572

५३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आजच्या अशांत युगात शांती व अहिंसेचेच तत्त्व जगाला आशेचा किरण दाखवून पथप्रदर्शन करील अशी प्रत्येकाची धारणा आहे. शांती व अहिंसेचा भारतात व भारताबाहेर अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचार केलेल्या सम्राट अशोकाच्या अशोकचक्राला आपल्या राष्ट्रीय ध्वजावर स्थान प्राप्त झाले आहे. त्याच महान सम्राटने स्वीकारलेल्या बौद्ध धर्माची दीक्षा आपण घेत आहात. भारताच्या शांती व अहिंसा नीतीचा प्रकाश आपण साऱ्या विश्वात प्रसारित कराल अशी आम्हास खात्री आहे. परमेश्वर आपणास दीर्घायुष्य प्रदान करो !

विनित

नागपूर : महापौर व सदस्य, .

दिनांक १५-१०-५६. नागपूर महानगरपालिका.” *

मानपत्र वाचल्यानंतर महापौरांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून सत्कार केला.

मानपत्राच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

' नागपूर कार्पोरेशनचे मेयर, कार्पोरेटर्स आणि उपस्थित नागरिकहो,

नागपूर शहराशी व या प्रांताशी माझा विशेष संबंध नाही. माझा राजकीय संबंधही तितकासा नाही. या प्रांताशी माझा संबंध एवढाच आहे की, येथे माझे काही लोक राहातात. या प्रांतासाठी मी विशेष असे काहीही केलेले नाही. म्युनिसीपालिटीचा मी काही सभासद नव्हतो. त्यामुळे म्युनिसीपल कारभाराबाबत तुम्हास उपदेश करू शकणार नाही. (हंशा). या प्रसंगी तुम्हास कोणत्या विषयावर दोन शब्द सांगावे याचा विचार मी करीत आहे. हा विचार करताना मला असे वाटते की, म्युनिसीपालिटीचा कारभार व देशाचा कारभार यात पुष्कळ साम्य आहे, म्हणून या प्रसंगी आपल्या देशाच्या कारभारासंबंधी मी तुम्हास दोन शब्द सांगू इच्छितो,

हिंदुस्थानात माझ्यासारखे विद्वान आहेत पण मला अभिनंदनपत्र भेट करून आपण माझ, गौरव केला, ही आपली उदारता आहे. भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा प्रत्येकाने विचार करावयास पाहिजे. बाह्यात्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंडमधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला, तर बहुतांशी सारखीच आहे. . तिकडे प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुका होतात, आपल्या देशातही तशाच निवडणुका

' प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक : २७ ऑक्टोबर १९५६.