राजकारणात भक्तीला . . . . . निर्माण होण्याचे भय असते ५३३
होतात. त्या देशात पार्लमेंट आहे, आपल्या देशातही पार्लमेंट आहे. त्या.
देशातील पार्लमेंटमध्ये बहुमताने निर्णय घेतात, आपल्या देशातील पार्लमेंटमध्येही
बहुमताने निर्णय घेतात. असे असले तरी त्या देशातील राज्यकारभारात एक
विलक्षण फरक दिसून येतो. इंग्लंडमध्ये प्रजातंत्रात्मक पद्धती आहे. आणि
आपल्या येथे डिक्टेटरशीपचा उदय झालेला दिसत आहे. आपल्या देशातील
कारभारात दिसायला एक व वागायला दुसरे असा प्रकार चालला आहे. तुम्ही
या गोष्टीबाबत आपल्या देशाची राज्यघटना कशी काम करते व ती कशी राबविली.
जाते याचा विचार करता की नाही मला माहीत नाही. लोकांनी आता
राज्यकारभाराबाबत व राज्यघटनेबाबत जागृत राहिले पाहिजे. भारताच्या नव्या
संविधानाचा आद्यकर्ता मी आहे हे मी अभिमानाने सांगतो असे नाही पण -निदान
मी तरी तिचा आद्यकर्ता असल्यामुळे तसा नित्य विचार करीत असतो. आणि
विचार करताना शेवटी या देशाचे होईल तरी काय असे भयानक चित्र माझ्या
डोळ्यापुढे उभे राहते.
मला निवडणुकीची आता मोठी आवड नाही. राजकारणाचा उपयोग घेऊन
मी पाहिला आहे. जातीपातीच्या भेदामुळे या देशातील राजकारण आता काँग्रेस
राजवटीत असे बनले आहे की, अल्पसंख्य असलेल्या जमातींना जीवनासाठी
तरणोपाय राहिलेला नाही. तरीपण मी काही राजकारण सोडणार
नाही. जातीभेदामुळे अनेक वेळा अपयशच आले. पण झगडणार आहे. मी माझे राजकारण चालूच ठेवणार आहे. मी बॅट सोडून तंबूत जाणार नाही.
(हंशा व टाळ्या)
मी तुम्हाला इंग्लंडमधील यंत्रणा व आपल्या देशातील यंत्रणा याबाबत सांगत होतो. इंग्लंड व आपल्यात मुख्य भेद असा की, आपल्याकडे मतदाराला उमेदवार निवडण्याचा हक्क दिसत नाही. तिकडे मतदारच उमेदवाराची निवड करतात. त्यांच्या मतदारसंघातील जे मतदार असतील त्यांना त्यांच्यामधील कोणता उमेदवार कसा आहे, त्याचे शिक्षण काय आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे, त्याची समाजसेवेची वृत्ती कशी आहे याची चांगली कल्पना असते व त्यानुसार तेथील मतदारच आपला उमेदवार कोण असावा हे ठरवितात. आपल्या देशात याबाबतची तऱ्हा काही निराळीच आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा करावा याचे स्वातंत्र्य अजूनही मतदारांना नाही. आज काँग्रेसची निवडणुकीबाबतची जी पद्धती चालू आहे त्यावरून तुम्हास हे दिसून येईल की, कोणत्या मतदारसंघात कोणास उभे करावे, [हे ] [सर्व ] [दिल्ली ] [काँग्रेस ] [हायकमांड ] ठरविते. त्याची वास्तपुस्त मतदारसंघातील मतदारांना काहीच