५३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नसते. हायकमांडने उभा केलेला उमेदवार कसा आहे, त्याचे चारित्र्य काय, त्याने काही काळाबाजार, अफरातफर केली आहे काय, तो समाजाच्या कल्याणाची बाजू घेऊन पार्लमेंट-असेंब्लीमध्ये झगडतो काय याच्याशी काँग्रेस हायकमांडने मतदारांना कोणतेच कर्तव्य ठेवलेले नाही. आम्ही सांगू त्याला तुम्ही मत दिलेच पाहिजे असा काँग्रेस हायकमांडचा दंडक आहे. काँग्रेसने एखादे गाढव उभे केले तरी त्याला तुम्ही मते देता. जर रस्त्यावरील खांबाला मते द्या असे सांगितले तरी काँग्रेसच्या हुकूमाप्रमाणे तुम्ही रस्त्यावरील खांबालासुद्धा मते द्याल. याला तुम्ही लोकशाही म्हणता? यास लोकशाही कोण म्हणेल? लोकशाहीवर हा शुद्ध घाला आहे. अशी पद्धत राष्ट्राला घातक आहे.
उमेदवार निवडण्याचा अधिकार त्या त्या मतदारगटाचा आहे. असे जर झाले नाही तर याला लोकशाही म्हणता येणार नाही. इंग्लंडमध्ये पक्षच नेत्याची आणि मंत्र्याची निवड करतो. आपल्याकडे मात्र नेता आपले सहकारी निवडण्याचे हक्क मागतो आणि ते राजरोस बजावतोही. ही उघड उघड हुकूमशाही आहे. त्यामुळेच. आज काँग्रेस सत्ताधारी आहे. ज्या रितीने येथील कारभार चालतो व तुम्हीच काँग्रेसच्या हातात सुत्रे देता यावरून तुंम्ही मूर्ख आहात, हे स्पष्टपणे तुम्हाला कोणीतरी सांगायलाच पाहिजे. (टाळ्या) हिंदुस्थान कोणीकडे जात आहे ? |
सध्या काँग्रेसच्या राजकारणात स्त्रियांच्या सभासदांची संख्या वाढविण्यात येत आहे. . स्त्रियांच्या या काँग्रेसी राजकारणाचा अर्थ काही समजत नाही. स्वधर्म सोडून बायकांनी राजकारणात हिंडावे यासारखी शरमेची गोष्ट नाही. महाराष्ट्रातील बायकांनी आता फक्त कासोटा सोडावयाचाच ठेवला आहे. काँग्रेसने २९२ बायका लोकसभेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर बायका विधीमंडळात गेल्या तर पुरुषांनी काय करावे ? दिवसभर लोकसभेत राहिल्यानंतर जेव्हा फाईल्स बगलेत धरून बायका घरी येतील तर काय नवरे त्यांच्या टेबलावर भोजन ठेवतील ? या बायांनी दिवसभर पार्लमेंट-असेंब्लीमध्ये जावयाचे आणि संध्याकाळी परत आल्यावर नवऱ्याला विचारायचे, ' अहो, मी पार्लमेंटमधून आले आहे. झाली आहे की नाही घरातील सर्व व्यवस्था ? ' या बाया पार्लमेंटमध्ये जायच्या आणि त्यांची मुलं कोणी सांभाळायची ? एक मूल रडत आहे, दुसऱ्याला ` शेंबूड आहे, तिसरे भलते ठिकाणी गेले आहे. अशा मुलांची व्यवस्था मग ` ठेवणार कोण ? हे सर्व उलटे होत आहे. हा जगाचा उलटा कारभार आहे. बरे, तर पार्लमेंटमध्ये जाऊन या बाया करतात तर! काय ? त्याबाबत मला तरी सांगण्याची शरम वाटते. त्यांच्याबाबत सांगावे असा माझा विचार नव्हता,