१५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते - Page 575

राजकारणात भक्तीला . . . . . निर्माण होण्याचे भय असते ५३५

पण आता सांगतोच. (हंशा) त्यांच्या अंगची नीतीमत्ता साफसाफ निघून चालली ,

आहे. माझ्याकडे काही पत्रे आलेली आहेत. त्या पत्रातील मजकर तर

पंतप्रधानाबाबतचा आहे. अशी पत्रे लिहिणारी बाई महाराष्ट्रीयन आहे. ही

मोठ्या शरमेची गोष्ट आहे. तिने पत्रामध्ये तर नेहरूचा उल्लेख करून आमचे

ते ' व आमचे ' हे ' असे करतील नि तसे करतील अशाप्रकारे लिहिले आहे. मी

कॅबिनेटमध्ये असताना मला बडोद्याच्या महाराष्ट्रीयन बाईची पत्रे येत. त्यात ती

मला भाऊजी म्हणत असे. जवाहरलाल नेहरूंना ती पती मानत असावी.

दोन-तीन पत्रे मी जाळून टाकली. एक पत्र ठेवले. मी राजीनाम! दिल्यावर

मला जी पार्टी नेहरूंनी दिली त्याप्रसंगी नेहरू दुसऱ्या लोकात हिंडत म्हणून बाजूला त्यांचा कोट धरून खेचला. मजजवळचे पत्र दाखविले तेव्हा ते म्हणाले,

' अशी फडतूस पत्रे मला हजारो येतात. त्याकडे दुर्लक्ष करावे. - मालवणकरांना विचारा', हे काय उत्तर झाले ? बडोद्याची बाई तुझे नाव बदनाम करीत आहे हे मला समजावून द्यावयाचे होते. पण अशी अनेक पत्रे येतात असे उत्तर देऊन टाकले. याला काय चारित्र्याची चाड आहे म्हणावे ? या सर्व गोष्टींचा तुम्ही सर्वानी पूर्ण विचार करावयास पाहिजे. या पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या स्त्रिया अशा बहकलेल्या असतील तर त्यांना तेथे काँग्रेसने जाऊ देण्याचे काय कारण आहे ?

काँग्रेसच्या राजकारणातील आता दुसरे एक उदाहरण पाहा. आमच्या मुंबई राज्यातील मोरारजी देसाई म्हणतात, मला बिनविरोध निवडा व मंत्री कोण घ्यावयाचे ते मी ठरवीन. एकदा निवडल्यावर माझ्या कारभारात कोणीही ढवळाढवळ करता कामा नये. आता या प्रकारास काय म्हणावे ते तुम्ही पाहा. ' उद्या समजा मोरारजींना निवडले आणि त्यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात एखादे कुत्रे नेमले तरी देखील त्यामध्ये कोणी ढवळाढवळ करू नये, असे सांगण्याचा मतलब आहे. ज्या इंग्लंडची राज्यपद्धती आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आली आहे तेथे हे कार्य कसे केले जाते ? त्या ठिकाणी सत्तेवर असलेल्या पक्षातील, पहिल्या रांगेत पार्लमेंटमध्ये बसलेले जे सभासद असतात त्या सर्वाच्या अनुमतीने या गोष्टी ठरविल्या जातात. एका माणसाला एकदा निवडले म्हणजे दुसरा कोणीही ढवळाढवळ करु नये असे तत्त्व तेथे कोणीही सांगत नाही व तसे सांगितले तर चालणारही नाही. पण आमच्या देशात मोरारजीभाईसारखे म्हणतात की, मी म्हणेन तेच झाले पाहिजे. उद्या मोरारजी मेले तर ती जागा त्यांच्याऐवजी तशीच राहील काय ? विधवेचा पुनर्विवाह होत नसे पण आता तसे नाही. जर्मनीमध्ये हिटलरची हुकूमशाही होती. त्याच्या एकट्याच्या तंत्राप्रमाणे त्याला राज्यकारभार हवा होता. त्यापेक्षा मोरारजी काही निराळे सांगत आहेत काय? हा अजब प्रकार या देशातच व काँग्रेस