दुःख निवारणाचा मार्ग दाखविणे बुद्ध धर्माचे अंतिम ध्येय ५४१
खात्री आहे. म्हणून मी येथे संदेश आणला नाही. मी तुम्हाला संदेश आणला नाहो, परंतु मी बौद्ध धर्म का स्वीकारला हे तुम्हाला सांगू इच्छितो. मी बौद्ध धर्म का स्वीकारला ? कारण त्यात समता, बंधुभाव आणि स्वातंत्र्य आहे. इतर धर्मामध्ये ईश्वर आणि आत्मा यांचेशिवाय दुसरे काही नाही. मनुष्यमात्राच्या उन्नतीला ही जी तीन कारणे आहेत त्यांचा इतर धर्मामध्ये समावेश केलेला नाही. बौद्ध धर्माचे अधिष्ठान, जगात दुःख आहे ह्या तत्त्वावर बसविलेले आहे, इश्वर व आत्मा यांचेवर बसविलेले नाही. माणसे जगामध्ये दुःखी आहेत ह्या तत्त्वावर बसविलेले आहे. इतकेच नव्हे तर त्या दुःखाचे निवारण करणे व ते निवारण्याचा मार्ग दाखविणे हे धर्माचे अंतिम ध्येय आहे, असे भगवंताने सांगितले आहे. जो धर्म या कसाला (कसोटीला) उतरणार नाही त्याला धर्म म्हणता येणार नाही, असे भगवंताने आपल्या पहिल्या सूत्रामध्ये-धर्मचक्र प्रवर्तनामध्ये-सांगितले आहे. असे कोणत्याच धर्मसंस्थापकाने सांगितले नाही. या कारणामुळे मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. दुःख निवारण्याकरिता प्रज्ञा पारमिता बुद्धाने सांगितली आहे.
यानंतर नेपाळचे प्रा. मिनिस्टर श्री. ठंका प्रसाद आचार्य यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून भाषण केले. त्यानंतर गव्हर्नमेंट कमिटीचे चेअरमन आणि नेपाळ महाराजांचे प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी श्री. लोक दर्शन यांचे स्वागत
करणारे भाषण झाले. त्यानंतर नेपाळचे राजेसाहेब वीर विक्रम सहदेव आणि भिक्षु चंद्रमणी यांची चेअरमन आणि धर्म शासक म्हणून नावे जाहीर
झाली. त्यानंतर नेपाळच्या महाराजांचे भाषण झाले. |
त्यानंतर सभेच्या शेवटी महाथेरो भिक्षु चंद्रमणी यांचे भाषण झाले. शेवटी
नेपाळच्या राजेसाहेबांनी सर्वांचे आभार मानले आणि नेपाळी राष्ट्रगीत बॅंडवर
वाजविल्यावर त्या दिवशीच्या सभेचा कार्यक्रम संपला." *
७ ७ ७
ere
१ प्रबुद्ध भारत : २४ नोव्हेंबर १९५६.