बौद्धधर्म व-मार्क्सवाद | ५४३
दीक्षा देऊन महान धम्मक्रांती केली आहे. आज या विश्व बौद्ध परिषदेत संपूर्ण जगातील बौद्ध प्रतिनिधींच्यावतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो '* आणि नंतर त्यांनी रंगीबेरंगी फुलांचा फार मोठा हार बाबासाहेबांच्या गळ्यात घातला भाषण देण्यासाठी नंतर बाबासाहेबांना विनंती करण्यात आली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सविताबाई बाबासाहेबांच्या मागे उभ्या राहिल्या. कॅमेऱ्यांनी भराभर फोटो टिपले आणि.मग धीरगंभीर वाणीने बाबासाहेबांनी ' बुद्ध की कार्ल मार्क्स ' या विषयावर अस्खलित असे. ऐतिहासिक भाषण दिले
ते आपल्या भाषणात म्हणाले, |
'“ सन्माननीय अध्यक्ष महाराज, आदरणीय भिक्षुगण आणि सद्गृहस्थहों,
जागतिक बौद्ध परिषदेच्या निमित्ताने नेपाळमध्ये येऊनसुद्धा परिषदेच्या कामकाजात एखाद्या प्रतिनिधीसारखा प्रत्यक्ष भाग घेऊ शकलो नाही याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. आज जरी मी या ठिकाणी उपस्थित असलो तरी मी शारीरिकदृष्ट्या आजारी असल्याने परिषदेच्या कामकाजातील दगदंग वं त्रास माझ्याने सोसवला जाणार नाही, याची जाणीव प्रतिनिधींना असावी अंशी मला खात्री आहे. परिषदेचा अनादर करण्यासाठी मी मुळीच गैरहजर राहिलो नाही. माझ्या शरीरस्वास्थामुळे मी एरिषदेच्या कामकाजाच्या कर्तव्यास बरोबर जागू शकणार नाही, ह्याच कारणास्तव मी उपस्थित राहू शकलो नाही. कदाचिंत परिषदेला गैरहजर राहिल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून की काय आज ह्या भरदुपारी तुमच्यापुढे भाषण देण्याबद्दल मला सांगण्यात आले आहे. मी भाषणासाठी मान्यता दिली आहे खरी, परंतु इथे उपस्थित झाल्यावरच ही अनपेक्षित गोष्ट माझ्यावर सोपविण्यात आली. तुम्हा लोकांपुढे व्याख्यान द्यावे लागेल याची मला किंचितही पूर्वसूचना नव्हती. मी कोणत्या विषयावर बोलू इच्छेन ह्याची मला विचारणा केल्यावर ' बौद्धधर्मातील अहिंसा ' हां विषय मी सांगितला होता. परंतु सर्वसाधारण मी ज्या विषयाचा ओझरता उल्लेख केला होता त्याच. विषयावर म्हणजे ' बौद्धधम्म व साम्यवाद ' ह्यावर मी बोलांवे असे परिषदेला उपस्थित असलेल्या बहुसंख्यांक लोकांना वाटत असल्याचे मला सांगण्यात आले. भाषणाचा विषय बदलण्यास जरी मी मान्यता दिली असली तरी प्रामाणिकपणे मला हे सांगितले पाहिजे की, हा विषय आकस्मिकपणे सोपविला गेला असल्याने एवढ्या महान व विस्तृत विषयावर बोलण्याची माझी तयारी झालेली नाही. हा विषय केवळ महान व विस्तृतच नाही तर अत्यंत १ मी पाहिलेले बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भिक्षु सुमेध--पृ. १२६-२७