२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 584

५४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भारदस्त आहे. ह्या भारदस्त विषयाच्या दडपणाखाली अर्धेअधिक जग सापडलेले आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध राष्ट्रातील तरुण विद्यार्थी वर्गसुद्धा ह्या विषयाच्या मगरमिठीत सापडलेला आहे. ही दुसरी बाब मला अत्यंत चिंताजनक

वाटते.

साम्यवाद जी जीवनप्रणाली सांगते त्या जीवनप्रणालीपेक्षा बौद्ध धम्माने सांगितलेली जीवनप्रणाली उत्कृष्ट व सरस आहे, अशी प्रशंसा जोपॅर्यंत बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढी करीत नाही तोपर्यंत बौद्ध धर्माचे भवितव्य उज्ज्वल आहे असे म्हणता येणार नाही. बौद्ध धर्मावरील श्रद्धा दोनअक पिढ्याही तग धरू शकणार नाही: यास्तव बौद्ध धम्मावर ज्यांची दृढ श्रद्धा आहे अशा लोकांनी तरुण पिढीस बौद्ध धर्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बौद्ध धर्मच पर्याय आहे, किंबहुना बौद्ध धर्मच ऐकमेव सर्वोत्तम जीवनमार्ग आहे असे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट पटवून दिल्यावरच बौद्ध धर्म टिकवून धरण्याची आशा. बाळगता येऊ शकते. आपण हेही तेवढेच ध्यानात घेतले पाहिजे की, युरोपमधील बहुसंख्यांक लोक व आशियामधील बहुसंख्यांक तरुण असा दृष्टिकोन बाळगतात की, आजच्या जगात कार्ल मार्क्स हाच केवळ एक पूजनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे. त्याचबरोबर ते असाही विचार प्रदर्शित करतात की, बौद्ध भिक्खु संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नव्हे तर एक [मोठे ] [पिवळे ] ' संकट आहे. अशा प्रकारची विचारसरणी कशाचे द्योतक आहे हे भिक्खुंनी लक्षात घेतले पाहिजे. तिच्यामागची पार्श्वभूमी त्यांनी समजून घेतली पाहिजे आणि कार्ल मार्क्सशी तुलना केली जावू शकेल अशाप्रकारे स्वतःला घडवून घेण्याची त्यांनी पराकाष्ठा करावयास पाहिजे. तेव्हाच बौद्ध धर्माचे श्रेष्ठत्व शाबीत केले जावू शकेल.

ह्या प्रास्ताविकानंतर बौद्ध तत्त्वज्ञान व मार्क्सवाद किंवा साम्यवाद हयातील ठळक वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे कोणते आहेत ह्याबद्दल मी आपणास विवेचन करून सांगेन. हे विवेचन बुद्धाचे तत्त्वज्ञान व मार्क्सचे तत्त्वज्ञान यांच्या आदर्शातील साम्य व भेद ह्या संबंधात असेल. जीवनातील उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी साम्यवादी जीवनमार्गपिक्षा बौद्धजीवनमार्ग मानवी जीवनाचे ध्येय हस्तगत करण्यात चिरंतन ठरू शकेल किंवा नाही ह्याचाही त्यात उहापोह असेल. जो जीवनमार्ग अल्पकालीन असेल, रानावनातून भटकविणारा असेल किंवा अराजकतेकडे घेवून जाणारा असेल अशा जीवनमार्गाचा पाठपुरावा करणे उचित ठरणार नाही. परंतु तुम्हाला अवलंबण्यास सांगितलेला मार्ग जर मंदगतीचा व लांब पल्ल्याचा असेल. तथापि तो खात्रीचा असून॑ सुरक्षित व भक्कम पायावर