बौद्धधर्म व मार्क्सवाद ५४५
पोहचविणारा असेल आणि तुमच्या आदर्श तत्त्वांना साहाय्यभूत ठरविणारा व तुमच्या जीवनाला स्थायीभाव देणारा असेल तर तोच मार्ग चोखाळणे न्यायाचे ठरेल. कमी अंतराचा ' शॉर्टकट ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेरी मार्गापेक्षा मंदगतीचा लांब पल्ल्याचा मार्गच आक्रमण करीत राहाणे केव्हाही रास्त असते. जीवनातले ' शॉर्टकट ' नेहमीच घातकी असतात. मुसतेच घातकी नव्हे तर महाघातकी असतात, हे संतत ध्यानात ठेवले पाहिजे.
आता मी माझ्या प्रमुख विषयाला हात घालतो. मार्क्सच्या साम्यवादाची
- विचारसरणी तरी काय आहे ?. त्याचे मूलभूत तत्त्वज्ञान तरी काय आहे ? साम्यवादी विचारसरणीचा मूलारंभ असा आहे की, ह्या जगात ' पिळवणूक ' चाललेली आहे. ही पिळवणूक धनिकांकडून गरिबांची होत आहे. कारण धनिकांना संपत्तीची हाव आहे. त्यांना अधिकाअधिक मालमत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते जनसमुदाय गुलाम करीत आहेत. ही गुलामगिरी शेवटी यातना, दुःख व गरिबी यांच्या निर्मितीस कारणीभूत होत आहे. हेच मार्क्सवादाच्या प्रारंभाचे मूळ आहे. मार्क्स ह्याने .' पिळवणूक ' ह्या शब्दप्रयोगाचा उपयोंग केला आहे. ही पिळवणूक नष्ट करण्यासाठी मार्क्सने कोणती उपाययोजना सांगितली आहे ? पिळवणूक होणाऱ्या ह्या एका वर्गाचे दैन्य व दु:ख नष्ट करण्यासाठी वैयक्तिक मालमत्तेवर प्रतिबंध घातला पाहिजे असे मार्क्सचे सांगणे आहे. व्यक्तीशः कोणीही मालमत्ता बाळगू नये किंवा धनसंचय करू नये. कारण कार्ल मार्क्सच्या तांत्रिक भाषेत सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, कामगारांच्या किंवा मजुरांच्या श्रमशक्तीपासून उत्पादित झालेले अतिरिक्त धन स्वतःच घेणारा किवा स्वतःच गिळंकृत करणारा हा खाजगी मालमत्तेचा एक मालक बनतो. कामगार आपल्या निढळाच्या घामाने उत्पादन वाढवितो व अतिरिक्त धन मिळवून देतो. परतु हया अतिरिक्त धनावर त्या कामगारांचा कोणताच अधिकार राहात नाही. त्याला त्यामधून काहीही हिस्सा मिळत नाही. ते सारे अतिरिक्त धन केवळ मालकच बळकावून बसतो. ही बाब लक्षात घेवून कार्ल मार्क्सने असा प्रश्न उपस्थित केला की, कामगारांनी आपल्या श्रमशक्तीच्या जोरावर निर्माण केलेल्या अधिक उत्पादित धनावर मालकाने काय म्हणून हक्क सांगावा ? मार्क्सच्या मतानुसार अतिरिक्त धनावर मालकाचा केव्हाही अधिकार असता कामा नये. अतिरिक्त धनावर केवळ राज्याचाच अधिकार असावा ; आणि हे राज्यसुद्धा कामगारांचे असावे. याच कल्पनेवर मजुरांच्या किंवा कामगार वर्गाच्या हुकूमशाहीचा सिद्धात मार्क्सने प्रस्थापित केला. मार्क्सने जे सिद्धांत प्रस्थापित केले, त्यातील हा एक तिसरा