५४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सिद्धांत आहे. कामगार वर्गाची हुकूमशाही ह्याचा अर्थ मार्क्स असा करतो की, शासन हे शोषिकांचे म्हणजे कामगारांची पिळवणूक करणाऱ्यांचे नसावे. ते शोषितांचे म्हणजे पिळवणूक होत असलेल्या कामगारांचे असावे. अशाप्रकारचे कार्ल मार्क्सचे मूलभूत सिद्धांत आहेत. याच सिद्धांतावर आधारित साम्यवादाची उभारणी रशियात झालेली आहे. या सिद्धांतात भरही घातली गेलेली आहे आणि भर घालणे सतत चालूही आहे. मात्र मूलभूत सिद्धांत सुरुवातीस सांगितल्याप्रमाणेच कायम आहेत.
मी आता क्षणभर बुद्ध तत्त्वज्ञानाकडे वळतो. कारण कार्ल मार्क्सने उपस्थित केलेल्या मूलभूत विचारसरणीच्या बाबतीत बुद्धाचे काही म्हणणे आहे का हेही पाहाणे आवश्यक आहे. मार्क्सने गरिबीच्या संबंधी किंवा कामगारांच्या पिळवणुकीसंबंधी प्रश्न उपस्थित करून आपल्या मार्क्सवादाची किंवा साम्यवादाची उभारणी केलेली आहे. बुद्ध काय म्हणतो ? बुद्धाने कोदून सुरुवात केलेली आहे ? बुद्ध तत्त्वज्ञानाची किंवा बुद्धाच्या धम्माची इमारत कोणत्या पायावर उभारली गेली आहे ? . कार्ल मार्क्सप्रमाणे बुद्धानेही २५०० वर्षापूर्वी म्हणजे कार्ल मार्क्सच्या कित्येक वर्ष अगोदर हीच गोष्ट सांगितली आहे. बुद्धाने म्हटले
जगात दु:ख आहे. '' बुद्धाने कार्ल मार्क्सप्रमाणे ' पिळवणूक ' हा शब्दप्रयोग उपयोगात आणला नाही. मात्र पिळवणुकीमधून जे दुःख, दैन्य निर्माण होते त्याच दुःखाची कल्पना देवून बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची, आपल्या धम्माची उभारणी केली. ' जगात दुःख आहे ' हे जगदूमान्य सत्य आहे असे सांगून
बुद्धाने दु:खाची परिभाषा निरनिराळ्या अर्थाने केली. दुःख म्हणजे पुनर्जन्म दुःख म्हणजे जीवनमरणाचा फेरा असाही अर्थ बुद्धाने केलेला आहे. परंतु ह्या अर्थाशी मी सहमत नाही. दुःख हा शब्द दारिव्र्य, गरिबी हया अर्थानेही उपयोगात आणला गेला असल्याचे बौद्ध वाङ्मयातून दिसून पडते. . तेव्हा बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक आढळत नाही. याचाच अर्थ असा की, कार्ल मार्क्सने प्रस्थापित केलेला सिद्धांत हाही नवीन नाही. तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची काहीही गरज नाही. बुद्धाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तमप्रकारे प्रस्थापित करून ठेवलेला आहे आणि तो त्याने आपल्या पहिल्या प्रवचनातील उपदेशात केलेला आहे. हे प्रवचन बौद्ध वाङ्मयात ' धम्मचक्रप्रवतैन सुत्त ' ह्या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सच्या विचाराचा पगडा बसलेला आहे त्यांना मला हेच सांगावयाचे आहे की, तुम्ही धम्मचक्रप्रवर्तन सुत्ताचा अभ्यास करा