बौद्धधर्म व मार्क्सवाद ५४७
व बुद्धाने काय म्हटले आहे हे समजून घ्या. मला खात्री आहे की, तुम्हाला त्यात मानवी जीवनसंग्रामाचे उतर खचितच आढळेल. बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची किवा धम्माची उभारणी ईश्वर, आत्मा किंवा अशाच अनाकलनीय अति मानवी बाबींवर केव्हाही केलेली नाही. त्याने मनुष्याच्या वास्तव जीवनाकडेच अंगुलीनिर्देश करून आपले सारे तत्त्वज्ञान विशद केलेले आहे. मनुष्य यातना, दुःख यानी पिडलेला असतो, ही मानवी जीवनाची. वास्तवता आहे. _ केवळ मार्क्सनेच ह्या गोष्टींचा उहापोह केला असे नव्हे तर त्याच्या जन्माअगोदर दोन हजार वर्षांपूर्वी बुद्धाने हया गोष्टी ज़ाणल्या व त्यावर उपायसुद्धा सांगितले, हे एक विशेष आहे. हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. याप्रमाणे गरिबीच्या संदर्भात बुद्धाच्या तत्त्वप्रणालीत व कार्ल मार्क्सच्या तत्त्वप्रणालीत कमालीचे साम्य आहे, हे तुम्हास कळून चुकेल.
मार्क्सच्या विचारानुसार कामगारांच्या पिळवणुकीचा प्रतिरोध करण्यासाठी उत्पादनापासून प्राप्त होणारी संपत्ती राज्याने आपल्या मालकिची करावयास पाहिजे. साऱ्या जमिनी राज्याच्या मालकिच्या असाव्यात, साऱ्या उद्योगधंद्यावर केवळ राज्याचाच अधिकार असावा, म्हणजेच व्यक्तिगत मालकास हुकूमत गाजविण्यास वाव मिळणार नाही. तसेच मजुरांच्या श्रमशक्तीने निर्माण केलेल्या उत्पादित वस्तूवरील अतिरिक्त फायद्याचा लाभ त्या मालकास होणार नाही व मजुरांना लुबाडण्याचा प्रसंगच येणार नाही. अशी ही पिळवणुकीच्या संदर्भात कार्ल मार्क्सची विचारसरणी आहे
व्यक्तिगत मालकी हक्काच्या संदर्भात बुद्धाची विचारसरणी काय आहे ते आपण तपासून पाहू. या. ह्यासाठी आपणास बौद्ध भिक्खुसंघाचा विचार करावा लागेल आणि बुद्धाने भिक्खुंसाठी लावलेल्या त्यांच्या जीवनविषयक नियमांची चिकित्सकपणे परीक्षा करावी लागेल. बुद्धाने भिक्खुंसाठी असे काय नियम केले
- आहेत ? बुद्धाने कटाक्षाने सांगितले की, कोणत्याही बौद्धभिक्खुने खाजगी मालमत्ता बाळगता कामा नये. वस्तुतः बोलावयाचे झाल्यास कोणत्याच भिक्खुजवळ स्वायत्त मालमत्ता असू नये, असा कडक निर्बध असूनही आज तुम्हाला अपवादात्मक काही उदाहरणे दिसतील: काही देशातील भिक्खुवर्मात त्यांच्याकडे वरील मालमत्ता असल्याचे मी स्वत: पाहिले आहे. परंतु बहुसंख्यांक भिक्खुंजवळ कोणतीच मालमत्ता नाही. मालमत्ता बाळगण्याच्या बाबतीत बौद्ध भिक्खुसंघाचे निर्बध एंवढे कडक आहेत की, रशियातील [साम्यवाद्यांनी ] [केलेले ] नियमसुद्धा एवढे कडक नसावेत. हा विषय अद्याप कोणीही विचारविनिमयासाठी न घेतलेला व निश्चित निर्णयाप्रत कोणीही न पोहचू शकलेला असा, [म्हणून ] [मी ]