२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 588

५४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भिक्खुसंघ निर्मितीमागे बुद्धाचे कोणते उद्दिष्ट असावे? भिक्खुंचा संघ असावा असे त्याला का वाटले असावे ? इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर असे आढळून येते की, बुद्ध जेव्हा आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार करीत होता तेव्हा ' परिव्राजक ' म्हटले जाणारे लोक इतस्ततः भटकत होते. एवढेच नव्हे तर बुद्धाच्या अगोदरपासून ते वावरत होते. ' परिव्राजक ' हया शब्दाचा अर्थ ' निराश्रित ' म्हणजेच ज्यांना घरदार नाही असे लोक, असा होतो. आर्यकाळात आर्यांच्या निरनिराळ्या टोळ्या इतर वन्य टोळ्यांसारख्या आपापसात लढत होत्या. विजयी टोळ्या स्थायिक होऊन राहात. पराभूत टोळ्यातील काही लोक मात्र आपले घरदार, मालमत्ता सोडून केवळ भ्रमंती करीत राहात. स्थायिक जीवन त्यांनी कधीही स्वीकारले नाही. अशा भटर्कणाऱ्या लोकांना कालान्तराने ' परिव्राजक ' म्हटले गेले. बुद्धाने अशा भटकत राहाणाऱ्या परिव्राजक लोकांना एकत्रित करून त्यांचा संघ निर्माण करण्याचे व त्यांच्या भ्रमणजीवनाला नियमबद्ध करण्याचे फार मोठे मोलाचे कार्य केले. ज्या नियमांनी अशा परिव्राजकांना बद्ध केले गेले त्या साऱ्या नियमांचा उल्लेख आपणास ' विनयपिटकात ' आढळतो. परिव्राजक बौद्धमिक्खु बनले वं विनयपिटकात निर्देशिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोरपणे वागू .लागले. त्यातील नियमाप्रमाणे भिक्खुला "गलमत्ता जमविण्याची किंवा बाळगण्याची परवानगी नव्हती. भिक्खुला पुढील केवळ सात वस्तुच बाळगण्यास सांगितले गेले होते. एक वस्तरा, एक लोटा, एक भिक्षापात्र, तीन चिवरे आणि एक सुई ह्या त्या सात वस्तु होत. साम्यवादाच्या मूळ गाभ्याबरहुकूम व्यक्तिगत मालमत्ता असू नये अशी जर बाब असेल तर विनय- पिटकातील बौद्ध भिक्खुसाठी सांगितलेला एवढा कडक निर्बध कुठेतरी असेल का ? मला तरी असा नियम कुढे आढळत नाही. म्हणून व्यक्तिगत मालमत्ता नसण्याच्या बाबतीत साम्यवादी मतंप्रणालीमध्ये एखाद्या आजच्या पिढीतील तरुणास आकर्षण वाटत असेल, तर त्याने खचितच बौद्ध तत्त्वज्ञानाच्या विनयपिटकात डोकवावे. त्याला ज्याचा शोध घ्यावयाचा आहे, ते त्यात निश्चितच गवसेल. परंतु प्रश्‍न असा निर्माण होतो की, व्यक्तिगत मालमत्ता नसण्याचा नियम साऱया संमाजाला कसा काय लागू करता येईल व केव्हापर्यंत लागू करता येईल ? अर्थात ही सारी बाब उपाययोजना, काळ, परिस्थिती व मानवी जीवनाचा विकास ह्यावर आधारित आहे. तात्त्विकदृष्टया विचार करता व्यक्तिगत मालमत्ता काढून घेणे खरोखरीच चुकीचे आहे का ? यदाकदाचित एखाद्यास खाजगी मालमत्ता बाळगण्याची इच्छा असेल, तर बौद्धधर्म आड येईल का ? निश्‍चितच नाही. कारण बौद्ध भिक्खुसंघाची- निर्मिती करताना बुद्धाने काही सवलती मान्य केल्या आहेत. आवश्यक गरजा भागविण्यास लागणारी मालमत्ता बाळगण्यास बुद्धाने मनाई केलेली नाही, ही बाब विशेषत्त्वाने ध्यानात घेतली पाहिजे.

|