२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 589

बौद्धधर्म व मार्क्सवाद ५४९

आता ह्याच बाबीच्या दुसऱ्या मुद्यांकडे आपण वळू. साम्यवाद घडवून आणण्यासाठी कार्ल मार्क्स किंवा साम्यवादी लोक कोणता मार्ग अवलंबवावा म्हणून सांगतात ? हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा आहे. साम्यवाद (म्हणजेच दुःखाचे अस्तित्व मान्य करून व्यक्तिगत मालमत्ता नष्ट करणे हा वाद) प्रस्थापित करण्यासाठी साम्यवाद्यांचा मार्ग अत्याचारी मार्ग आहे, विरोधकांची हत्त्या करण्याचा मार्ग आहे आणि ह्यातच बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या उपाययोजनांच्या मार्गात मूलभूत फरक आहे. बौद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्धधम्म प्रस्थापित करण्यासाठी लोकांची मने वळविणे हा बुद्धाचा सनदशीर मार्ग आहे. नैतिक शिकवणीने व प्रेमाने लोकांची मने वळविणे यावर बुद्धाचा भर आहे. बुद्धाला विरोधकांना जोरजबरीने किंवा सत्तेने जिंकावयाचे नसून प्रेमाने व आपुलकीने जिकावयाचे आहे. हा मूलभूत फरक लक्षात घेतला म्हणजे असे कळून येते की, तत्त्वज्ञान प्रस्थापण्यासाठी बुद्धाला रक्तपात मान्य नाही. हिंसा मान्य नाही. उलट साम्यवाद्यांना हिंसेचाच मार्ग पसंत आहे. या मार्गाने साम्यवाद्यांना ताबडतोब फलप्राप्ती होते किंवा त्यांची उद्दिष्टे जलद सफल होतात यात मुळीच वाद नाही. कारण तुम्ही जेव्हा मनुष्य निर्मूलनाचेच तत्त्व अंमलात आणता तेव्हा तुम्हाला विरोध करणारा किंवा तुमचा प्रतिकार करणाराच कोणी उरत नाही. अर्थात ही सफलता केवळ दिखाऊच असते. मार्क्सवादाच्या तुलनेत बुद्धाचा मार्ग मंदगतीचा व लांब पल्ल्याचा आहे. कदाचित तो लोकांना कंठाळवाणाही वाटण्याचा संभव आहे. कारण सफलता फार उशिरा प्राप्त होते. मात्र हेही तेवढेच खरे की त्या मार्गात सुरक्षितता आहे. तुमच्या जीवाची हमी आहे. यास्तव तुम्ही तुमच्या आदर्शाबरहुकूम मार्ग आक्रमित असताना बुद्धाच्याच बिनधोक मार्गावर पाऊल ठेवणे हितावह होणार आहे.

मी माझ्या साम्यवादी मित्रांना नेहमी दोन तीन प्रश्‍नांची उत्तरे मागतं असतो. परंतु मला प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की, माझ्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास ते समर्थ नाहीत. ते मजूर वर्गाची हुकूमशाही रक्तपाताने प्रस्थापित करू इच्छितात. राजकीय सत्तेचे वर्चस्व असणाऱ्यांना ते नेस्तनाबूत करू इच्छितात. त्यांच्या मतानुसार लोकसभेत प्रतिनिधीत्व असू शकत नाही. मताधिकार असू शकत नाही. त्यांना केवळ राज्याची एकतंत्री महाप्रजा म्हणून राहावयाचे आहे. त्यांना सत्तावाटप किंवा अधिकार वाटप न करता राज्य करावयाचे आहे. त्यामुळे त्यांना मी असा प्रश्‍न करतो की, हुकूमशाही ही लोकांवर राज्य करण्याची योग्य पद्धती आहे का ? त्यावर ते असे उत्तर देतात की, हुकूमशाही त्यांना केव्हाही मान्य नाही. मग मी त्यांना परत विचारतो की, मजुरांची तरी हुकूमशाही त्यांनी का मान्य करावी ? त्यावर ते उत्तर देतात की, सध्याचा काळ निर्वाणीचा काळ असल्याने कामगारांची हुकूमशाही निर्माण होणे