५५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अत्यावश्यक आहे. मजूर वर्गाची हुकूमशाही निर्माण झाल्याशिवाय प्रस्थापित भांडवलदारांची किंवा अतिरिक्त धन गिळंकृत करणाऱ्या मालक वर्गाचा नायनाट होणार नाही. अजून त्यांना प्रश्न केला की, हा निर्वाणीचा कालावधी तरी केवढा आहे ? वीस वर्षे, चाळीस वर्षे की पन्नास वर्षे ? याला त्यांचे निश्चित उत्तर नाही. ते गुळमुळीत उत्तर देतात की, साम्यवाद स्थिर झाल्यावर मजूरवर्गीय हुकूमशाही आपोआपच नष्ट होईल. कल्पना करू या की, ती आपोआपच नष्ट झाली. मग पुढे काय? तिची जागा कोण घेईल ? मनुष्याला कोणत्याच प्रकारच्या शासनाची आवश्यकता वोटणार नाही काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
याच संदर्भात जेव्हा आपण बुद्धाकडे वळतो आणि त्याच्या धम्मासंबंधी प्रश्न उपस्थित करतो तेव्हा तो काय म्हणतो ? बुद्धाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायाने जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होवू शकणार नाही असे बुद्धाचे सांगणे आहे. बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याची मनोधारणा ` बदलली गेली व त्यानुसार त्याने साम्यवादी विचारसरणी स्वीकारून तीवर निष्ठेने प्रेम केले व ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, तर ती खचितच स्थायी स्वरूप प्राप्त करू शकल आणि अशावेळेस मनुष्याला कायदेकानूनच्या बेडीत अडकविण्यास सैनिकी किंवा पोलिसी कारवाईची जरुरी पडणार नाही. असे का घडू शकेल ? याला उत्तर असे की, नैतिकतेने वागण्यास व योग्य मार्गाने चालण्यास तुमच्या मनाची जडणघडणच बुद्धाने तयार केलेली असेल. तुमचे मनच चिरंतन स्वरुपात सन्मार्गी झालेले असेल.
साम्यवादाची उपाययोजना संबंधाची विचारसरणी जुलूमजबरदस्तीवर आधारलेली आहे. कल्पना करा की, उद्या रशियातील साम्यवादी हुकूमशाही बारगळली किंवा तशी
चिन्हे दिसू लागली तर काय होईल ? साम्यवादाची अवस्था कशी होईल हे जाणून घेण्यास
मी निश्चितच उत्सूक राहीन. माझ्या कल्पनेप्रमाणे राज्याच्या मालकीची मालमत्ता बळकावण्यास रशियन लोक परस्परात रक्तपात घडवून आणतील. आपापसात लढाया करतील. ही परिणती अपरिहार्य अशीच राहील. कारण रशियातील लोकांनी साम्यवादी विचारसरणी सहजासहजी स्वीकारलेली नाही. आपणहून ती त्यांनी मान्य. केलेली नाही. ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादली गेली आहे. साम्यवाद प्रस्थापित करताना त्यांना ही भीती घातली गेली की, त्यांनी जर साम्यवादी विचारप्रणाली मानली नाही, तर त्यांना फासावर लटकविले जाईल आणि त्यामुळेच ते अजून ती निमूटपणे पाळीत आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, भयापोटी कोणतीच विचारप्रणाली मूळ धरू शकत नाही. एखादी विचारप्रणाली ग्रहण केली गेली परंतु कालान्तराने तिची