२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 591

बौद्धधर्म व मार्क्सवाद ५५१

धारणाशक्ती नष्ट झाली, तर त्या विचारप्रणालीचे पुढे काय होईल, या प्रश्‍नाचे उत्तर जोपर्यंत देता येणार नाही, तोपर्यंत ती लोकांच्या मंनावर बिंबविण्यात काहीच अर्थ नाही. कारण मनोभूमिकाच तयार केली गेली नसेल तर सत्तेची नेहमीच जरुरी भासेल. याच कारणास्तव मला नेहमी बुद्धाचे आकर्षण वाटते. बुद्धाची विचारसरणी ही लोकशाहीची विचारसरणी आहे.

अजातशत्रूला वज्जींना जिकावयाचे होते. हे सांगण्यासाठी अजातशत्रूचा सरसेनापती बुद्धाकडे आला. बुद्ध त्याला म्हणाला की, राजा वज्जींचा पराभव करू शकणार नाही. कारण वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीला धरून राज्यशकट चालवीत आहेत, तोपर्यंत त्यांचा पराभव होणे शक्य नाही. बुद्धाने वज्जींच्या जुन्या पद्धतीचे उघड स्पष्टीकरण कोणत्या कारणामुळे केले नाही हे कळायला काही मार्ग नाही. परंतु ज्या बाबतीत बोलला ती बाब वज्जींच्या लोकशाहीप्रधान व गणतंत्री राज्यकारभारासंबंधीच होती यात मात्र संशय नाही. आणि म्हणूनच बुद्ध म्हणाला की, वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे चालतील, तोपर्यंत ते कधीच पराजित होणार नाहीत. यावरून बुद्ध हा लोकशाहीचा मोठा पुरस्कर्ता होता हे उघड होते.

अध्यक्ष महाराज जर मला परवानगी देतील तर मला तुमच्या हेच निदर्शनास आणून द्यावयाचे आहे की, मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो, मी अर्थशास्त्राचाही विद्यार्थी होतो. एवढेच नव्हे तर मी अर्थशास्त्राचा प्राध्यापकही होतो. माझ्या जीवनातील बराच कालावधी कार्ल मार्क्स, साम्यवाद व इतर अनेक विषय ह्यांचा अभ्यास करण्यात घालविला. तसेच बुद्धाच्या धम्माचाही अभ्यास करण्यात मी बराच काळ व्यतीत केला. बुद्ध तत्त्वज्ञान व मार्क्सवाद ह्यांचा जेव्हा मी तौलनिक अभ्यास केला, तेव्हा मी ह्याच निष्कर्षाला पोहचलो की, जगातील एका फार मोठ्या समस्येच्या बाबतीत म्हणजेच जगात 'दुःख आहे व त्याच्या निवारणाचा एक निश्‍चित उपाय आहे, ह्या बाबतीत बुद्धाचाच मार्ग सर्वोत्तम आहे, सुरक्षित आहे आणि भरभक्कम आहे. ह्याच कारणास्तव मी बौद्ध राष्ट्रातील तरुण पिढीस सांगू इच्छितो की, त्यांनी बुद्धाच्याच वास्तववादी तत्त्वज्ञानावर विशेष भर दिला पाहिजे व त्यावरच आपले सारे लक्ष केन्द्रिभूत केले पाहिजे. |

यदाकदाचित बौद्ध धर्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच, तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खुंनाच जबाबदार धरावे लागेल कारण मला तरी व्यक्तीशः असे वाटते की, ज्या भिक्खुंनी तनमनधनाने आपली कर्तव्ये बजावयास पाहिजे, ती त्यांनी पाळली नाहीत असाच त्याचा अर्थ असेल. आज कोठे धर्मप्रचार होत आहे ? बौद्ध धम्म प्रचाराची आज काय स्थिती आहे ? भिक्खुचे खरे कर्तव्य धम्मप्रसार करणे असे आहे. तो भिक्खु आज काय करतो ? आजचा भिक्खु . खावून पिवून विहारात स्वस्थ राहतो. तो केवळ एकच वेळ जेवण घेतो यात शंका नाही. परंतु बहुतांशी त्याचा वेळ निव्वळ आळसातच जातो. थोडेफार तो वाचन करतो. परंतु बहुधा तो झोपाच काढतो. संध्याकाळी स्वतःचे मन