२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 592

५५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

संगीतात थोडे रिझवितो. हा मार्ग धम्मप्रसार करण्याचा खचितच नव्हे. मित्रहो, कोणावर टीका करण्याचा माझा हेतु नाही. परंतु धम्मात जर समाजात नवजागृती करण्याची नैतिक शक्‍ती असेल, तर धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवली पाहिजे. धम्म तत्त्वज्ञान लोकांच्या कानात सतत ओतत राहिले पाहिजे. शाळेत मुलाला किती वर्षे घालवावी लागतात ? तुम्ही मुलाला केवळ एका दिवसासाठी शाळेत पाठवीत नाही. त्यानंतर त्याला घरी ठेवून त्या मुलाने सारे शिक्षण ग्रहण करावे, सारे ज्ञान प्राप्त करून घ्यावे, अशी तुम्ही अपेक्षा करीत नाही. मुलगा दररोज शाळेत गेला, पाच तास तेथे तो बसला व सतत त्याने अभ्यास केला, तरच तो थोडेफार ज्ञान मिळवू शकतो, थोडी फार विद्या हस्तगत करू शकतो. आजचे भिक्खु एकही दिवस लोकांना विहारात बोलावित नाहीत किवा एखाद्या विषयाचे शिक्षण देत नाहीत किंवा धर्मोपदेशही करीत नाहीत. माझ्या तरी पाहाण्यात अशी

गोष्ट नाही. |

मी एकदा सिलोनला गेलो होतो. भिक्खु कसा काय धम्मप्रचार करतात हे ` मला अवलोकन करावयाचे आहे, असे मी तेथील लोकांना सांगितले. त्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे 'दान' ही पद्धत आहे. नंतर मला समजले की, 'वणाक' या अर्थाने 'दान' या शब्दाचा उपयोग केला जातो. त्यांनी मला अकरा वाजण्याच्या सुमारास अका ठिकाणी नेले. तेथे टेबलाच्या आकाराची अक चौरस वस्तू होती. मी जमिनीवर बसलो. थोड्या वेळात अक भिक्खु आले. बऱ्याच उपस्थित स्त्री-पुरुषांनी पाणी घेऊन त्यांचे पाय धुतले. नंतर ते चौरंगावर बसले. त्यांच्याजवळ हवा करण्यासाठी अक हातपंखा होता. ते काहीतरी पुटपुटले. पण काय पुटपुटले ते अका ईश्वरासच ठावूक ! अर्थात त्यांनी ते धम्मप्रवचन सिंहली भाषेत केले असावे. पण ते सुद्धा केवळ दोन मिनिटेच ! त्यानंतर ते निघून गेले.

आता, तुम्ही ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये जावून घघा. तेथे काय होते ? तेथे प्रत्येक आठवड्याला लोक एकत्र जमतात. तेथे ते प्रार्थना करतात. एखादा त्यांचा धर्मगुरू बायबलमधील एखाद्या विषयावर प्रवचन करून ख्रिस्ताने काय सदुपदेश केला हे समजावून सांगतो. त्या सदुपदेशाचे पुन्हा पुन्हा स्मरण करा, ` म्हणून लोकांना आवाहन करतो. तुम्ही हे ऐकून निश्‍चितच आश्चर्यचकित व्हाल की, ख्रिस्ती धर्माचा नव्वद टक्के भाग तत्त्वश: व रचनात्मकदृष्ट्या बौद्धधर्मापासूनच घेतला गेलेला आहे. तुम्ही रोममध्ये जा. तेथील मुख्य चर्च पाहा. तुम्हाला भरहूत येथील 'विश्‍्वकर्मा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिराची निश्‍चितच आठवण होईल. |