२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 593

बौद्धधर्म व मार्क्सवाद ५५३

व्हिशबिग्ने हा चीनमध्ये एक खिश्चन मिशनरी होता. त्याने बौद्ध धर्मावर एक पुस्तकही लिहिले आहे. बौद्ध धर्म व खिस्ती धर्म ह्यात असलेल्या कमालीच्या साम्याबद्दल त्याने आपले आश्‍चर्य प्रकट केले आहे. बाह्यात्कारी जरी तो बौद्धांनी खिश्चनांची नक्कल केले असे म्हणण्याचे धारिष्ट्य करीत नसला तरी खिश्‍चनांनी बौद्ध तत्त्वज्ञानाची उसणवारी केली हेही मान्य करण्यास तो तयार नाही. या बाबतीत सांगण्यासारखे खूप आहे.

काळ आता खूपच पालटलेला आहे. खिशश्‍चनांनी बौद्ध तत्त्वज्ञानाची नक्कल केली यात मुळीच वाद नाही. परंतु बौद्ध धम्मप्रसारासाठी खिश्‍चनांनी स्वीकारलेल्या मार्गाची बौद्धांनी नक्कल करण्यास कसलीच हरकत नसावी. जरी ते मार्ग बहकले तरी बुद्धाचा धम्म त्यांच्या मार्गदर्शनासाठी एखाद्या पोलिसासारखा सदैव उभा आहे. लोकांच्या मनावर ही गोष्ट बिंबविल्याशिवाय बौद्धधर्माचा होणारा ऱ्हास थांबविता येणार नाही. आजसुद्धा बौद्ध राष्ट्रात बौद्ध धर्माची अत्यंत वाईट स्थिती आहे. एवढे असूनही लोकांवर बौद्ध धर्माचा पगडा अजूनही कायम आहे यात संशय नाही.

जाता जाता मला एका अत्यंत मनोरंजक व महत्त्वपूर्ण बाबीची माहिती द्यावयाची आहे. ती मी ब्रम्हदेशात गेलो असताना पाहिली. तेथे मला एका परिषदेसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळेस तेथील लोकांनी मला ब्रह्मदेशात खेड्याची पुनर्रचना कशी केली जात आहे, हे दाखविण्यासाठी एका खेड्यात नेले. मला फार आनंद वाटला. तेथील एका कमिटीने खेड्याच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार केलेला होता. त्या खेड्यातील सारे रस्ते नेहमीसारखे वाकडे .तिकडे व अव्यस्थित होते. त्यांना ते रस्ते सरळ करावयाचे होते. त्यासाठी त्या कमिटीने लोखंडी खांब रोवून सरळ असे दोर बांधले आणि रस्ते अशा प्रकारे सरळ केले पाहिजेत असे ठरविले. मला असे आढळले की कमिटीने आखल्याप्रमाणे रस्ता बऱ्याच लोकांच्या खाजगी जागेतून जात होता. त्यावर मी प्रश्‍न केला की, अशा परिस्थितीत कमिटी कसा काय रस्ता तयार करू शकेल ? ज्यांच्या खाजगी जागेतून रस्ता जाणार त्या लोकांना त्याची भरपाई देण्यास कमिटीकडे तेवढा पैसा आहे का ? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, कोणीही पैशाची मागणी केलेली नाही. उलट रस्ता करण्यास जागा हवी असल्यास ती खुषीने घेतली जावी अशी प्रत्येकाने तयारी दाखविलेली आहे. हे ऐकून मी खरोखरीच आश्चर्यचकित झालो. हे कसे शक्य झाले ? कारण माझ्या देशात नुकसान भरपाई केल्याशिवाय एखाद्याची थोडीसी जरी जमीन घेतली गेली तर रक्त सांडले जाते ; परंतु ब्रह्मदेशात तसे घडत नाही, असे का? ब्रह्मी लोक आपल्या