२०-११-१९५६ बुद्ध की कार्ल मार्क्स - Page 594

५५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मालमत्तेबाबतीत एवढे उदार कसे ? त्यांना आपल्या जमिनीचा लोभ नाही का ? त्यांना आपल्या मालमत्तेची काळजी वाटत नाही का ? याचे कारण हेच की, बुद्धाचा 'सर्वम अनित्यम्‌ ' हा उपदेश त्यांच्या मनावर चांगला ठसलेला आहे. जगातील कोणतीच वस्तू नित्य नाही, शाश्‍वत नाही, तर ती नश्वर आहे, मग अशा अनित्य वस्तुसाठी भांडावे तरी कशाला ? जमीन जर हवी आहे तर ती खुशाल घ्या, अशी त्यांची मनोधारणा बनलेली आहे.

बंधु भगिनींनो, इतःपर मी अजून काही सांगावे असे काहीच राहिलेले नाही. आपणास केवळ काही मुद्यांचे दर्शन घडवावे एवढीच माझी मनीषा होती. साम्यवादाच्या विजयदुंदुभीने तुम्ही बावरून जाऊ नका किंवा भुलून जाऊ नका किंवा दीपूनही जाऊ नका. तुम्ही जर बौद्ध विचारसरणीचा व तत्त्वज्ञानाचा एक दशांस भाग जरी आत्मसात करू शकलात तंर साम्यवाद जे काही निर्माण करू इच्छितो, ते तुम्ही करुणा, न्याय व सद्भावना ह्यांच्या जोरावर घडवून आणू शकाल, यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद ! ” *

' बाबासाहेबांच्या ह्या भाषणातील विचार परिषदेच्या अनेक प्रतिनिधींना बौद्ध धर्माचे एक अभिनव दर्शनच वाटले. बुद्धाच्या चार आर्यसत्यांपैकी एक आर्य सत्य, जे दुःख, त्याचे मार्क्सच्या आर्थिक पिळवणुकीशी त्यांनी दाखविलेले साम्य, “आणि बौद्ध धर्माचे एक स्फूर्तिप्रद जिवंत सामाजिक शक्ती म्हणून त्यांनी केलेले विवरण हे नवे दृष्टिकोन आहेत आणि त्याला बुद्धवचनांचा आधारही आहे असे काही विद्वान भिक्खुंनी बाबासाहेबांजवळ मुद्दाम येऊन बोलून दाखविले.'' २

` बुद्ध, मार्क्स आणि धम्माचे भवितव्य : रत्नमित्रा गणवीर पृ. २९-४४.

* प्रबुद्ध भारत : ३ ऑगस्ट १९५७.

*४ थी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्स - खाटमांडू-नेपाळचा रिपोर्ट.