२४-११-१९५६ 'ब्रह्मां सत्य जगन्मिथ्या' ही एक बौद्धिक लटपट आहे - Page 595

३४८ |

' ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ' ही एक बौद्धिक लटपट आहे

. “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनांक २३ नोव्हेंबर १९५६ रोजी रात्री ९ वाजता असनसोल पॅसेंजरने येणार असल्यामुळे वाराणसी कँट स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यासाठी सन्माननीय व्यक्ती, काशी विद्यापीठ आणि हिंदू विश्वविद्यालयाचे विद्यार्थी, महाबोधि सभेचे कार्यकर्ते तसेच दलित वर्गातील लोक प्रचंड प्रमाणात उपस्थित होते. स्टेशनवर आलेल्या लोकात प्रामुख्याने श्री. प्रभुनारायणसिंह एम. एससी., भिक्षु धर्मरक्षित, भिक्षु संघरत्न, मेळा अधिकारी श्री. जगदीशशरणसिंह, श्री. जगन्नाथ उपाध्याय उपस्थित होते.

स्टेशनवर बँड वाजविण्यात येत होता तसेच घोषणा दिल्या जात होत्या. लोक बौद्ध पताका घेऊन गाडी येण्याची वाट पाहात होते. गाडी येताच ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय' 'आंबेडकर जिंदाबाद' असे नारे दिल्या जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केल्या गेले. गर्दी अनावर असल्यामुळे काही लोक त्यात दबले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेशनहून ' हॉटेल दी पॅरिस ' मध्ये गेले आणि जेवण केल्यानंतर ते सारनाथ करिता रवाना झाले. ते तेथील नवनिर्मित अतिथीगृहात थांबले. त्यांचा तेथे २३ नोव्हेंबर १९५६ ते २७ नोव्हेंबर १९५६ दुपारपर्यंत मुक्काम होता. या दरम्यान त्यांनी त्या विभागात भाषणे दिली.

दिनांक २४ नोव्हेंबर १९५६ रोजी ३ वाजता काशी हिंदू विश्वविद्यालय संघाच्या द्वारे आयोजित आर्टस्‌ कॉलेजच्या मैदानात भरलेल्या सभेला त्यांनी संबोधित

केले. "^

'' डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

मी आपल्यासमोर कोणत्या विषयावर बोलावे हे मला सुचविण्यात आलेले नाही. तरी तुमच्या हिंदू विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्यावर जे विचार माझ्या मनात घोळू लागले आहेत तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. हिंदू समाज- रचनेचा एक अभ्यासक या नात्याने हिंदू-जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना मला भिज्न भिन्न तात्विक विचारसरणी आढळल्या. बुद्धकाळी

* घर्मदुत : महाबोधी सभा, सारनाथचे मासिक मुखपत्र, संपादक ब्रिपिटिकाचार्य भिक्षु धर्मरक्षित, डिसेंबर १९५६ पृ २४४, २५७२५८. |