५५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ब्याण्णव दर्शने प्रचलित होती. त्यापैकी सहा अभ्यासनीय मानली जात. वर्तमान काळातील सर्वसामान्य हिंदू समाज वव्हंशी शंकराचार्याचे तत्त्वज्ञान प्रमाण मानतो. शंकराचार्याचा मुख्य सिद्धांत म्हणजे ' ब्रह्म॑ सत्यं जगन्मिथ्या ! ' ब्रह्म तेवढे सत्य व इतर जग मायामय आहे, या विचाराची हिंदू मनावर घड़ पकड बसलेली आहे, आपण हा सिद्धांत मनुष्याला कितपत उपयुक्त आहे याचा विचार केला आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. माझा तुम्हास प्रश्न आहे की, हा सिद्धांत माणसाला कितपत मार्गदर्शक आहे ? शंकराचार्य म्हणतात ' ब्रह्मां सत्यं.' परंतु या सत्याची व्याख्या काय? व्यावहारिक जीवनात माणसाची पंच-ज्ञानेंद्रिये हीच सत्यासत्याचा निर्वाळा देतात. ज्ञानेंद्रिये हीच त्याची ज्ञानार्जनाची अंतिम साधने आहेत. फुलाचा सुगंध घ्राणेंद्रियाने कळतो. रंग, आकार दृष्टिद्रियाने प्रतीत होतो, त्याच्या चवीची साक्ष जिव्हा देते. परंतु शंकराचे ब्रह्म ' नेति नेति ' शब्दानेच वर्णिले जाते. शंकराची ब्रह्माची व्याख्या नकारात्मक आहे. याउलट महायानाची ब्रह्म विहाराची कल्पना चित्य आहे. त्यांच्या ब्रह्मविहारात दान, उपरेखा (त्याग), करूणा आणि मैत्री या चार गुणांच्या परमोत्कर्षाचा अंतर्भाव आहे. ज्या ज्या ठिकाणी या गुण चतुष्टयीचा वास आहे, त्या त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने ब्रह्म आहे. शंकर आपले ब्रह्म कुठे आहे किंवा कसे आहे याची चाहूलही लागू देत नाही.
एखाद्या विधानात (P००७०) वास्तव सत्य नसले, केवळ काल्पनिक सत्य असले तरी व्यवहारात त्याचा उपयोग होऊ शकतो. कायद्यामध्ये आम्ही सामाजिक हितासाठी कायदेशीर काल्पनिक सत्य (1७७॥। 1८४०१) मानतो. उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडे जमिनीचा तुकडा आहे परंतु त्याने तो कोणापासून खरेदी केला किंवा वारसा हक्काने मिळविला त्यासंबंधी त्याच्याजवळ खरेदीखत अथवा इतर कायदेशीर कागदपत्रे नाहीत अशावेळी कोर्ट एक सिद्धांत निमिते की त्याला ती जमीन राजाने बक्षिस दिलेली असेल असे काल्पनिक सत्य गृहीत धरण्यात काहीच चुकत नाही. शंकर ब्रह्म सर्वत्र आहे असे सांगतो. हे सार्वत्रिक ब्रह्म काल्पनिक सत्य म्हणून मानावयास हरकत नाही. पण मग असा प्रश्न उद्भवतो की, ब्रह्म सर्वत्र आहे तर सर्वच समान मानले पाहिजेत. जर ब्राह्मणात ब्रह्म तर तो अस्पृश्यातही असला पाहिजे. पण मग ब्राह्मण श्रेष्ठ व अस्पृश्य नीच असा भेद का केला जातो ? जर शंकराने ब्रह्माच्या सार्वत्रिकतेच्या आधाराने अखिल मानवजात एक आहे असे मानून समतेचा पुरस्कार केला. असता तर तो सिद्धांत विचारार्ह