२४-११-१९५६ 'ब्रह्मां सत्य जगन्मिथ्या' ही एक बौद्धिक लटपट आहे - Page 597

' ब्रह्म॑ सत्यं जगन्मिथ्या ' ही एक बौद्धिक लटपट आहे ५५७

व गंभीर गणला गेला असता, मग शंकराशी वाद घालण्याचे आम्हाला कारणच उरले नसते. माझा शंकरावरील आक्षेप असा आहे की तो ' ब्रह्मा सत्यं ' हे विधान केवळ बौद्धिक पातळीवर राखून ठेवतो, तो ते सामाजिक पातळीवर आणण्यास धजत नाही

|

' जगन्मिथ्या ' म्हणजे जग एक दृष्टिभ्रम आहे. हा सिद्धांत तरी व्यावहारिक दृष्टीने'कितपत साधार आहे. आमच्या ज्ञानाची साधने जी ज्ञानेंद्रिये ती जगाच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून देत आहेत. असे असताना जगाचे अस्तित्व आम्हास कसे नाकारता येईल ? जर जगालाच अस्तित्व नसेल तर मला व तुम्हाला तरी अस्तित्व कुठचे उरते ? आणि माझ्या जाणीवेला (Conisciousneऽऽ) तरी काय अर्थ उरतो? अशी एक कथा आहे की, एके दिवशी शंकरावर एक उन्मत्त हत्ती धावून आला आणि शंकर जग मिथ्या आहे हा आपला सिद्धांत विसरून पळू लागला. त्याला पळताना पाहून आजूबाजूचे लोक त्याला उद्देशून म्हणाले ' अहो पळता काय ? हत्ती मिथ्या आहे ' शंकराने उत्तर दिले 'माझं पळणंही मिथ्या आहे ' या उत्तरात शंकराचे प्रत्युत्पन्नमतित्व दिसून आले 'असेल, परंतु त्याने कोणाही बुद्धिवाद्याचे समाधान होणार नाही. एकूण " ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या * ही एक बौद्धिक लटपट आहे. ज्या सिद्धांताचा तात्त्विक परिणाम चातुर्वर्ण्याला मूठमाती देण्यात झाला असता, तो सिद्धांत शंकराने बौद्धिक पातळीपुरता खरा मानून सामाजिक जीवनात त्याच्या प्रवेशाला प्रतिबंध केला. विचारआचारांची ही विसंगती आणि अप्रामाणिकपणा थेट शंकरापासून गांधींपर्यंत दिसून येतात. गांधींना मी एकदा प्रश्‍न केला होता की, तुमचे चातुर्वर्ण्य हाताच्या उभ्या पंजाच्या बोटांसारखे एकावर एक असे आहे की, आडव्या पंजाच्या बोटासारखे समान पातळीवर आहे ? माझ्या प्रश्‍नाचे त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु त्यांची श्रद्धा क्रमिक विषमतेवर (Graded ।n९१५०।/) होती यात संशय नाही. त्यांचे 'वर्णव्यवस्था' व ' गांधी शिक्षण ' हे गुजराती ग्रंथ त्याची

साक्ष देत आहेत.

हिंदू लोक वेद मानतात आणि त्यातील पुरुषसुक्त तर त्यांच्या नित्य पठणात असते. या सुक्तात समाजाची रचना कशी असते एवढेच केवळ सांगितले असते तर ते फारसे आक्षेपार्ह ठरले नसते. समाजात चार वेगळे व्यवसाय करणारे लोक असतात हे विधान केवळ ऐतिहासिक सत्य ठरेल. परंतु या चार प्रकारच्या व्यवसायातील लोकांना श्रेष्ठ-कनिष्ठता, उच्च-नीचता धार्मिक दृष्टीने चिकटवून देणे हा शुद्ध दुष्टपणा आहे. आणि म्हणूनच विषमतेला व