२४-११-१९५६ बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे कौ, त्यांनी दर रविवारी बुद्धविहारात जावे - Page 599

३०९
बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारी
बुद्धविहारात जावे

“ दिनांक २४ नोव्हेंबर १९५६ रोजी दुपारी १ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर काशीहून सारनाथला आले. ते तेथील भिक्खुंना भेटले. त्यांच्याशी चर्चा' करताना बाबासाहेबांनी मुख्यत्वेकरून प्रत्येक बौद्धाने दर रविवारी नियमितरित्या बुद्ध मंदिरात जाऊन उपदेश ग्रहण करावा" यावर. जोर दिला. तसेच त्यांनी प्रत्येक भागात बुद्ध मंदीर निर्माण करून त्यात सभा घेण्यासाठी मुबलक जागा असलेले सभागृह असावे असे निक्षून सांगितले. या दृष्टीने सिलोन, ब्रह्मदेश, तिबेट, चीन इत्यादी देशातील भिक्खुनी अग्रेसर होऊन आणि पैसा जमवून मदत करण्याचा त्यांनी सल्ला दिला. ” १

याप्रसंगी उपस्थित लोकांना आणि भिक्खुंना संबोधित करताना डॉ. बाबासाहेब. आंबेडकर म्हणाले

जनतेने. आता गंभीरपणे विचार'केला पाहिजे. हिंदू धर्मग्रंथात जे जीवन

` वर्णन केलेले आहे त्याचा व आम्ही तयार केलेल्या घटनेत काही साम्य आहे

काय ? जर साम्य नसेल तर त्याचे कारण काय ? आमचा धर्म, घटना या दोहोंपैकी एक गोष्ट आम्ही स्वीकारली पाहिजे. एक तर धर्माला जिवंत ठेवले पाहिजे किंवा घटनेलाच जगवले पाहिजे. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी राहू

शकत नाही, दोहोत मेळ बसू शकत नाही.

हिंदू धर्मात अनेक मते आहेत, त्या सर्वात शंकराचार्यांचे मत सर्वात चांगले समजले जाते. शंकराचार्याचा ' ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या ' हा सिद्धांत सर्वात अधिक महत्त्वपूर्ण समजला जातो. परंतु बौद्ध धर्माच्या उच्च सिद्धांतासमोर तो अगदी तुच्छ व निरर्थक आहे. नवीन झालेल्या बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारला बौद्ध मंदिरात गेले पाहिजे. असे जर झाले नाही तर नवीन बौद्धांना धर्माचा परिचय होणार नाही. यासाठी ठिकठिकाणी बुद्ध मंदिरे निर्माण झाली पाहिजेत. मंदिरात सभा घ्यायला जागा असावी. लंका, बर्मा, तिबेट, चीन आदी देशातील बौद्ध भिक्खुंनी पुढाकार घेऊन पैसा गोळा करावा व हिंदुस्थानातील बौद्ध लोकांना मदत करावी,

१ घर्मदूत : डिसेंबर १९५६ पृ. २४४.