१७-२-१९४६ मरणाच्या तयारीनोच आम्ही समरांगणात उतरलो आहोत - Page 60

२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मी गेली २० वर्षे आपले ध्येय आणि त्या ध्येयसिद्धीचे मार्ग आपणास सांगत आलो आहे आणि आज माझी खात्री आहे की, त्याच आपल्या ध्येयाकरिता

आपण सर्वजण पूर्ण संघटितपणे तयार झाला आहात. आज मी मागील धडा

न वाचता येत्या ११ तारखेस आपले कर्तव्य काय या विषयीच मुख्यत: बोलणार आहे.

गेल्या निवडणुकीचे वेळी प्रतिपक्षीयांशी आपली हातघाईं झालेली नव्हती. त्यावेळी आपण आजच्याइतके संघटीतही झालो नव्हतो, परंतु आज आपली शक्ती प्रचंड वाढली असल्यामुळे शत्रू बेभान झाला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या आपल्या प्राथमिक निवडणुकीचे वेळी काँग्रेसच्या लोकांनी चोखाजी गांगुर्ड या आपल्या एका वीराची हत्या केली. हुतात्मा चोखाची गांगुर्डे यांच्या शरीरावर शत्रूंनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या वाराच्या २१ जखमा होत्या, असे मला समजले आहे. या हुतात्म्याच्या प्रचंड अंत्ययात्रेच्या वेळी पोलिसांच्या तीव्र लाठीहल्ल्यात रामचंद्र कांबळे हा आपला दुसरा वीर बळी पडला व अनेकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. नागपूरलाही गजभिये व वासनिक हे आपले वीर बळी गेले. परवा साताऱयालाही आपल्या सभेवर काँग्रेसच्या लोकांनी दगडांचा मारा केला. पण सुदैवाने आपले कोणी जखमी न होता शत्रुचेच लोक रक्तबंबाळ झाले !

गेल्या निवडणुकीच्या वेळी कॉँग्रेस वर्दळीवर आली नाही. आपल्याशी उघड सामना करण्यास धजावली नाही व आजच काँग्रेस आपल्याशी का लढते आहे, हे आपण चांगले समजून घेतले पाहिजे.

काँग्रेसच्या लोकांचा आपल्या मानी अस्पृश्य वर्गावर जो कटाक्ष आहे तो

आपण राजकरणात पडलो आहोत म्हणून किंवा आपण निवडणुकी लढवीत

आहोत म्हणून नव्हे तर त्यांना आपले फेडरेशन नको आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा काटा त्यांच्या डोळ्यात सलत आहे. आपल्या फेडरेशनच्या प्रचंड शक्तीमुळे काँग्रेसवाले बेभान झाले आहेत.

अस्पृश्य लोकांनी त्याचप्रमाणे मुसलमान लोकांनी निवडणुकीकरिता फुटकळ फुटकळ उभे राहावे, त्यांचा समाज विखुरलेला असावा, असे काँग्रेसला वाटते, अशा प्रकारे फुटकळ झालेल्या समाजातील लोकांना काँग्रेसमध्ये ओढण्याची त्या लोकांची धडपड चाललेली असते. कुत्र्यापुढे हाड टाकले म्हणजे तो जास्त भुंकत नाही, त्याचप्रमाणे फुटकळ रीतीने निवडून आलेल्यास काँग्रेसला सहज वश करता येते. कुणाला जोड्याचे, कुणाला गटाराचे कॉन्ट्रॅक्ट देऊन कॉँग्रेसचे मिंधे बनवता येते. उलट एखाद्या बलवान संस्थेच्या उमेदवारास कसलेही आमिष दाखविले तरी तो वश होणार नाही. म्हणून शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही आपली प्रचंड संघटना कॉँग्रेसला नको आहे.