१७-२-१९४६ मरणाच्या तयारीनोच आम्ही समरांगणात उतरलो आहोत - Page 61

मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत २३

कॉँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या आजचा राजकीय दृष्टिकोन जर चांगला न्याहाळून पाहिला तर काँग्रेस ही एकच संस्था राहावी असे त्यांना वाटते. बाकीच्या लोकांनी निमूटपणे काँग्रेसमध्येच सामील व्हावे, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. काँग्रेस हीच एक संस्था, एक नेता व एकच मार्ग असे सामर्थ्य संपादून इतर सर्व समाजावर अनिर्बंध सत्ता गाजवावी अशी काँग्रेसच्या लोकांची जबर धडपड चालली आहे. आपल्याला हाणून पाडण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करीत आहेत. नुकतेच आपल्या लोकांवर जे हल्ले झाले व होत आहेत, आपल्या ज्या शूरवीरांची हत्या झाली आहे, त्याचे कारण म्हणजे कॉग्रेसची हीच राक्षसी महत्त्वाकांक्षा !

मला तुम्हाला सांगावयाचे आहे ते हे की, विरोधी पक्षाच्या कसल्याही गुंडगिरीला तुम्ही घाबरता कामा नये. तुमच्या ध्येयप्रेमाबद्दल व ध्येयाबद्दल मी नि:शंक आहे. सर्वांनी येत्या ११ मार्चला आपल्या उमेदवारास प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केलाच पाहिजे. तुम्ही कोणाच्याही धमकावणीला भीक घालता कामा नये, डरता कामा नये.

हुतात्मा गांगुर्डे हा चांगला कार्यकर्ता होता. दुसरेही आपले वीर हुतात्मे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्या सर्वाच्या कुटुंबीयांना माझे सांगणे आहे की, तुम्ही दु:ख करू नका, मरण ही आज ना उद्या पण निश्‍चितपणे घडून येणारी गोष्ट आहे. हुतात्मा गांगुर्ड व इतरांचे मरण हे वीरांचे मरण आहे. [त्यांच्या ] [मृत्युमुळे ] सर्व समाज दुःखी झाला आहे. हे वीर हुतात्मे मेले नसून अमर झाले आहेत ! त्यांचे मरण हे विलोभनीय मरण आहे.

कांग्रेसवाल्यांना मला हे सांगावयाचे आहे की, अशा धमक्यांनी, अत्याचारी हल्ल्यांनी किंवा त्यांच्या भीतीने आम्ही भिऊन जाणार नाही. आम्ही मरणाच्या तयारीनेच समरांगणात उतरलो आहोत. सामना करण्याची पूर्ण तयारी आहे. जे काही होणार असले ते होईल. आमच्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करण्याची आमची सिद्धता आहे. आम्ही अपमानास्पद रीतीने शरण जाणार नाही. आमच्या सामर्थ्याबद्दल आम्हास पूर्ण आत्मविश्‍वास आहे. आम्ही शत्रुला नाक मुठीत धरायला लावूच लावू. [(प्रचंड ] [टाळ्या) ] [शेवटी ] विजय आमचाच आहे.

द्रोण जातीने ब्राह्मण होता. तो श्रीमंतांच्या वस्तीत राहात होता. त्याच्या मुलाचे नाव अश्वत्थामा, श्रीमंतांची मुले चांदीच्या पात्रात दूध आणून पीत असत. ते पाहून अश्वत्थामाही आपल्या आईजवळ दूध मागत असे. गरीब असल्यामुळे द्रोणाच्या घरी गाय नव्हती. मग चांदीचे भांडे कसचे ? अश्वत्थाम्याची